आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Wear Sharmilas Wedding Dress In Her Marraige

लग्नात करीना परिधान करणार सासूबाई शर्मिलाचा शरारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबरला बॉलिवूडचे हे हॉट कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नात करीना कोणता ड्रेस परिधान करणार याची उत्सुकता आहे. चला तर तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला सांगतो करीना लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार आहे. लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असतो. यादिवशी खास ड्रेस परिधान करावा अशी तिची इच्छा असते.आता भावी मिसेस खान अर्थातच करीना तिच्या लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार हे निश्चित झाले आहे. तसे पाहत फिल्म इंडस्ट्रीतले टॉपचे ड्रेस डिझायनर्स करीनाचे मित्र आहेत. मात्र त्यांना करीनाच्या वेडिंग ड्रेससाठी मेहनत घ्यावी लागणार नाहीय. कारण लग्नात करीना तिच्या होणा-या सासूबाईंचा म्हणजेच शर्मिला टागोर यांचा शरारा घालणार आहे. हा शरारा शर्मिला यांनी त्यांच्या लग्नात परिधान केला होता. पटौदी कुटुंबाची तशी परंपराच आहे. करीनानेही परंपरेचा मान राखत आणि कोणतेही आढेवेढे न घेत शर्मिला यांच्या लग्नातला शरारा परिधान करायला होकार दिला आहे.
PHOTOS : करीना कपूरचा नवा झीरो साईज अंदाज
ऑक्टोबरमध्ये करीना होणार छोट्या नवाबाची बेगम!
अखेर कुठे हरवली सैफची बेगम करीना
२०१२ वर्षात विविध कारणांमुळे चर्चेत राहील करीना