आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्व्हर स्क्रिनवर रंगणार कतरिना-शाहिदचा रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ आता मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दक्षिणेचा सुपरस्टार आणि दिग्दर्शक प्रभुदेवाच्या ‘नमक’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
कॅटरिनाने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, मी शाहिदसोबत याआधी एकाही चित्रपटात काम केले नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळाच असेल. सध्या मी इतर चित्रपटात व्यस्त असल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण हे 2013 मध्ये सुरू होईल. तसेच प्रभुदेवाशी याबाबत बोलणे झाले असून त्याला देखील काही अडचण नाही. तसेच शाहिद देखील या चित्रपटाबाबत उत्साही आहे.
2007 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या एका चित्रपटात मी आणि कॅटरिना एकत्र दिसणार होतो. मात्र, काही कारणामुळे हा चित्रपट आम्हाला दोघांना एकत्र करता आला नसल्याचे शाहिदने सांगितले.
प्रभुदेवाचा ‘राउडी राठौर’ हा चित्रपट सध्या बॉलीवूडमध्ये धूम करत आहे. तसेच या चित्रपटाने नुकतीच 100 कोटींची कमाई करुन अनेक चित्रपटांना अस्मान दाखवले. प्रभुदेवाने बॉलीवूडमध्ये ‘हमसे है मुकाबला’ हा चित्रपट केला होता. त्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये फार कमी चित्रपट केले. यामध्ये त्याने माधुरीसोबत ‘पुकार’ या चित्रपटात एका गाण्यावर जबरदस्त नृत्य केले होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून तो दिग्दर्शनाकडे वळला आहे. सलमान खानला घेऊन त्याने ‘वॉन्टेड’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट भन्नाट गाजला होता. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आता त्याने आपला मोर्चा हा दिग्दर्शनाकडे वळवला आहे. ‘राउडी राठौर’च्या यशानंतर तो आता बेबी डॉल कॅटरिना आणि शाहिद कपूर यांना घेऊन ‘नमक’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
शाहरुखसोबत करणार हॉट सीन - सध्या बॉलीवूडमध्ये यश चोप्रा यांच्या नाव न ठरलेल्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील लंडन येथे सुरू झाले आहे. यामध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा असे त्रिकूट दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये शाहरुख आणि कॅटरिनामध्ये हॉट सीन चित्रित करण्यात आले. यावेळी यश चोप्रा देखील उपस्थित होते. प्रेक्षक या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट आहेत. मात्र, चोप्रा साहेबांनी या चित्रपटाचे नामकरण अद्याप केले नाही.