आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दीपिका, प्रियंकाला मागे टाकत कतरिना ठरली नंबर वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतरिना कैफच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा कतरिनाला सर्वात सेक्सी वुमनचा किताब दिला आहे. एफएचएम मॅग्झिनच्या जगातील १०० सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत कतरिना पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या अदांनी सलग चौथ्यांदा कतरिनाने हा मान पटकावला आहे. एफएचएम मॅग्झिनच्या यंदाच्या अंकात या ग्लॅम डॉलला हा किताब प्रदान करण्यात आला आहे.
एफएचएमने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार कतरिनाने फ्रिडा पिन्टो, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोपडाला मागे टाकत आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे नुकतीच एका मुलीची आई झालेल्या ऐश्वर्याला पहिल्या दहामध्येही स्थान मिळवता आलेले नाही. कतरिनाने बुम या चित्रपटातून आपल्या बॉलिवुड कारर्किदीला सुरूवात केली होती. सध्या ती शाहरुखबरोबर लंडनमध्ये आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी आहे. कतरिना लवकरच एकेककरुन बॉलिवूडच्या तिन्ही खानमंडळींबरोबर अर्थातच सलमान, शाहरुख आणि आमिरबरोबर झळकणार आहे. सेक्सिएस्ट वुमनबरोबरच कतरिना बी टाऊनमधली एक यशस्वी अभिनेत्रीदेखील आहे.
पाहा, जगातल्या सेक्सी वुमनच्या या मदमस्त अदा...