आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळा विषय घेऊन येत आहे 'जोडी ब्रेकर्स'

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोडी ब्रेकर्स ही काहाणी आहे सिद आणि सोनाली या दोघांची. सिनेमाच्या शिर्षकातच सिनेमाची स्टोरी लाईन देण्यात आली आहे. नावाप्रमाणेच जोड्या तोडण्याचा सिद आणि सोनालीचा उद्योग असतो. भांडणा-या प्रेमी जोडप्यांना वेगळं करणे, लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये काही तणाव असल्यास ताबडतोब त्यांना घटस्फोटासाठी तयार करणे हे काम सिद आणि सोनाली करत असतात. इतरांना वेगळ करता करता हे दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात याचं चित्रण 'जोडी ब्रेकर्स' या सिनेमात करण्यात आलं आहे.

आर. माधवनने या सिनेमात सिदची भूमिका साकरली आहे. तर सोनालीच्या भूमिकेत आहे हॉट बिपाशा बासू.
दिग्दर्शक अश्विनी चौधरीने आर. माधवन आणि बिपाशा हे हटके कॉम्बिनेशन एकत्र आणलं आहे.

जोडी ब्रेकर्स हा एक रोमॅण्टीक सिनेमा आहे.

आर. माधवन आणि बिपाशा बासूबरोबर ओमी वैद्य, हेलन, मिलिंद सोमण हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकरणार आहेत