आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवी 'बोल बच्चन'गिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक क्षणात एक जीप हवेत उडते आणि बसच्या विंडशील्डच्या काचेला उद्धवस्त करुन निघून जाते. तर काही वेळाने एक जीप पाण्याचे ड्रम घेऊन जाणा-या ट्रकवर जाऊन धडकते. बसेस उलट्यापालट्या पडतात. आणि अखेरीस एक कार उंच टेकडीच्या किना-यावर जाऊन अडकून पडते. जेव्हा अजय देवगण आणि अभिषेक बच्चन डझनभर गुंडांची धुलाई करतात तेव्हा सगळे गुंड हवेत उडायला लागतात. असे स्टंट सिक्वेन्सेस पाहून आपण आश्चर्यचकीत होत असतो. आता या सगळ्यावरुन हा एक अँक्शन सिनेमा आहे, असाच विचार तुम्ही करत असाल ना. तर तसे नाहीये. वास्तवात ही एक कॉमेडी फिल्म आहे. याला आपण अँक्शन कॉमेडी सिनेमाही म्हणू शकतो. अँक्शन कॉमेडी चित्रपट लोकप्रिय मनोरंजनाचा एक प्रकार आहे.
दिग्दर्शिक रोहित शेट्टीच्या सिंघम, गोलमाल सिरीजच्या चित्रपटांमध्ये अजयने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, त्यामुळे अजयची जादू रोहितच्या प्रत्येक चित्रपटात कायम राहिल असे मानल्या जाऊ लागले आहे. या चित्रपटातही अजय डार्क शेड्समध्ये आहे. मिशी आणि पिळदार शरीरयष्टी असलेला आणि तोडकीमोडकी इंग्रजी बोलणारा असा हा पहेलवान अजयने रंगवला आहे. हा पहेलवान 'मैं तुम्हे छठी का दुध याद दिला दुंगा'च्या ऐवजी 'मैं तुम्हें मिल्क नंबर सिक्स याद दिला दुंगा' असा वाक्यप्रयोग करत असतो. अर्थातच इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान नसल्यामुळेच तो इंग्रजी भाषेची खिडची करत असतो.
हा पहेलवान इथवरच थांबत नाही तर 'मेहनत सक्सेस की कुंजी है'च्या ऐवजी 'मेहनत सैक्सोफोन का की-होल है', असा सरास वाक्यप्रयोग करतो. बोलीभाषेत याला इंग्रजीचा पाय मोडणे, असे म्हणतात. हे संवाद ऐकून तुम्हाला हसू नक्की येईल. मात्र तेही कधी कधीच.यावरुन गुणवत्तेची जास्त काळजी करण्याची गरज नाही, असा स्पष्ट अर्थ काढला जाऊ शकतो. कारण कोटींच्या घरात कमाई करणे हाच एकमेव उद्देश निर्माता-दिग्दर्शकाचा असतो. सिंघम आणि गोलमाल ३ हे दोन्ही १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेले सिनेमे आहेत. शेवटी पैसा हा निर्मात्यांच्याच खात्यात जातो. मात्र अलिकडे प्रेक्षकही बॉक्स ऑफीसच्या आकड्यांमध्ये रुची घेऊ लागले आहेत. इतर लोक एखादा सिनेमा बघायला जातात, याचा अर्थ चित्रपटात नक्कीच काही तरी खास असणार असाच विचार प्रेक्षक करायला लागला आहे.
100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या 12 चित्रपटांपैकी थ्री इडियट्स, दबंग, रावन या चित्रपटांना वगळे असता बाकीचे सर्व सिक्वेल चित्रपट आहेत. बोल बच्चन हा सिनेमाही 1979मध्ये रिलीज झालेल्या आणि हिट ठरलेल्या गोलमाल या चित्रपटाचा रिमेक आहे.
अभिषेक बच्चनने अमोल पालेकरांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. तर उत्पल दत्त यांच्या भूमिकेशी साधर्म्य साधणा-या भूमिकेत अजय देवगण दिसतो. मुळ चित्रपटात उत्पल दत्त यांना मिशी नसलेल्या माणसाचा तिटकारा असतो. म्हणूनच अमोल पालेकर यांना नकली मिशी लावावी लागते. मिशी चित्रपटाचा मुळ गाभा असल्यामुळे गोलमाल खूपच मजेशीर चित्रपट होता.एका वादग्रस्त मंदिराचे कुलूप तोडल्यामुळे आपण मुस्लिम असल्याचे सत्य अब्बासला (देवगण ) त्याच्या बॉसकडून लपवून ठेवावे लागते. आता यावरुन त्याच्या हिंदू बॉसला इतर धर्मांपासून काही अडचण आहे असे मुळीच नाहीये. आता मुळ कथेतच दम नसल्यामुळे चित्रपटाची कहाणी प्रभाव पाडत नाही.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा बोअर अँक्शन कॉमेडी सिनेमा असल्याचे आपल्या लक्षात येते. मात्र काही लोकांना तसे वाटतही नसेल, कारण मोबाईलवर घिसेपिटे एसएमएस जोक्स आपल्याला येतच असतात. जितक्या गाड्या शोरुममध्येही नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गाड्या लोकांच्या डोक्यावरुन उडतांना दिसतात.
कदाचित काहींना हे सगळे काही एक्साईटिंगही वाटेल. मात्र चित्रपटात विनोदाला कुठे पूर्णविराम द्यायला हवा, हे दिग्दर्शकाला सुचलेले नाहीये. हा चित्रपट पाहतांना कधी कधी अजयच्या व्यक्तिरेखेप्रमाणे 'आता बस करा, खूप झाले', असे ओरडून बोलण्याची वेळ आपल्यावर येते.
(लेखक हे प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत)
EVENT PICS: 'बोल बच्चन'च्या प्रीमिअरला बच्चनचा बोलबाला
गुजरातमध्ये मध्यरात्री रिलीज झाला 'बोल बच्चन'
'क्रेजी कॉमेडी' आहे 'बोल बच्चन'
VIDEO : 'बोल बच्चन'च्या 'नच ले'मध्ये अभिषेक-प्राचीचा जलवा !
PHOTOS : 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर 'बोल बच्चन'