आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pooja Bhatt's Disclaimer: Jism 2 Is For Those Who Understand Erotica

'लहान मुलांसाठी नाही सनी लियोनचा जिस्म-2'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा भट्टच्या आगामी 'जिस्म 2' या चित्रपटाला सेंसॉर बोर्डने 'ए' दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. या संदर्भात पूजा भट्टने सांगितले की, हा चित्रपट वयस्क चित्रपट असून परिपक्व दर्शकांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ४० वर्षीय पूजाचे म्हणणे आहे की, हा चित्रपट फक्त मल्टीप्लेक्सच्या दर्शकांसाठी बनवण्यात आलेला नाही. पुढे ती असेही म्हणाली की, एका विशिष्ठ वर्गासाठी मी चित्रपट तयार करत नाही. पूजाचे म्हणणे आहे की, ती अशा विषयावर चित्रपट तयार करते, जो सामान्य व्यक्ती समजू शकेल. त्यानंतर तिने हे ही आवर्जून सांगितले की लहान मुलांनी हा चित्रपट पाहू नये.
पूजाने सांगितले,"आम्ही 'ए' सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. कारण मी स्पष्ट बोलणारी आहे आणि मला 'ए' दर्जाचेच सर्टिफिकेट हवे होते. 'यू/ए' दर्जाचे नाही. मी लहान मुलांसाठी हा चित्रपट तयार केलेला नाही. हा वयस्कर लोकांसाठी आणि त्यांना समजेल असा चित्रपट आहे. वयस्कर दर्शकांची संख्या जास्त प्रमाणात आहे, आणि ते माझ्यासाठी खूप आहे.
चित्रपटातील बोल्ड सीन्स कमी करण्याच्या बाबतीत विचारल्यानंतर पूजाने सांगितले की, त्या दृश्यांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
पूजाने सांगितले की, सेंसॉर बोर्डने मला तीन गाणे आणि एका दृश्यात बदल करण्यास सांगितले होते. या तीन गाण्यात एक चूक होती, जी इंटरनेटवर यापूर्वीच आली आहे. सेंसॉर बोर्डने या दृश्यांना दिग्दर्शकाची विचारशीलता समजून माफ केले आहे.
पूजाचे असे म्हणणे आहे की, दर्शक परिपक्व होत आहेत आणि यामुळेच मी हा चित्रपट तयार करू शकले.
या चित्रपटात सनी लियोनबरोबर अरुणोदय सिंह आणि रणदीप हुड्डा मेन लीडमध्ये आहेत. पोर्न स्टार सनी लियोनचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. ऑगस्ट महिन्यात हा चित्रपटत सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
बोल्डसीन कमी केल्या शिवाय 'जिस्म-२'ला प्रमाणपत्र नाही - सेन्सॉर बोर्ड
LEAKED PICS: 'जिस्म 2'च्या नवीन गाण्यात रोमान्समध्ये मग्न असलेली सनी
NEW PICS: 'जिस्म २' मधील रेड हॉट सनी लियोन