आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरचा सत्यमेव जयते आणि लैंगिक शोषण झालेल्यांचे दुःख (छायाचित्र)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानने त्याचा टेलिव्हिजन शो 'सत्यमेव जयते'च्या दुस-या भागाच्या माध्यमातून देशाला ते कटू सत्य सांगितले, जे देशातील आर्ध्याहून अधिक लोकांनी आपल्या मनात लपवून ठेवले आहे. रविवारी आमिरने लैंगिक शोषणासारखा गंभीर विषय उजेडात आणला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी अशा काही व्यथा कथन केल्या ज्या देशातील अर्ध्या लोकसंख्येने भोगल्या आहेत, मात्र त्या व्यक्त करण्याची हिम्मत त्यांच्यात नव्हती.
या कार्यक्रमात आमिर खानने मुलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा मांडला. आकड्यांकडे लक्ष दिले तर भारतातील ५३ टक्के मुले या दुष्कृत्यीची शिकार झाली आहेत. 'सत्यमेव जयते'च्या निर्मात्यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ यु ट्यूबवर अपलोड केला आहे. त्यातून घेतलेली निवडक छायाचित्र खास 'दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी.