आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वत:च्‍या चित्रपटात आयटम नंबर करेन- सोनम कपूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सावरियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री करणारी सोनम कपूर तिची 'डेलिकेट डार्लिंग' ही इमेज बदलू इच्छिते. आगामी 'प्‍लेअर्स' या चित्रपटात सोनम आधीच्‍या चित्रपटांपेक्षा खूप वेगळी दिसणार आहे. यात तिचा हॉट लूक दिसेल. अनिल कपूर 'मिशन इम्‍पॉसिबल' या हॉलिवूडपटात झळकणार असल्‍यामुळे ती खूप खूश आहे. टॉम क्रूज 'मिशन इम्‍पॉसिबल'च्‍या प्रमोशनसाठी भारतात येणार असल्‍याने सध्‍या ती टॉमची वाट पाहात आहे. सोनम कपूरशी आमच्‍या पत्रकाराने खास बातचीत केली.

जगभरात प्रसिद्ध असलेला टॉम क्रूज भारतात येणार आहे. त्‍याच्‍या पाहुणचारासाठी तू तयार आहेस का?
- हो. मी अगदी तयार आहे. माझे डॅडी अनिल कपूरही उत्‍साहात आहेत. डॅडी त्‍याच्‍या स्‍वागतसाठी एक शानदार पार्टी देतील, पण अजून निश्चित नाही. खरे तर, त्‍यावेळी मी 'प्‍लेअर्स'च्‍या प्रमोशनमध्‍ये व्‍यस्‍त असेन. पण टॉमशी भेटण्‍याची संधी मी सोडणार नाही. संपूर्ण जगासाठी ते टॉम क्रूज असतील, पण माझ्यासाठी ते पहिल्‍यापासून टॉम टॉप गन क्रूज आहेत.

जर टॉमने तुला एखाद्या भूमिकेची ऑफर दिली तर तू काय करशील?
- (स्मितहास्‍य करत) हे तर एखादे जुने स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखेच होईल.

तू 'प्‍लेअर्स'मध्‍ये बिकीनी घालण्‍यासाठी नकार दिला होतास अशी चर्चा होती. तू केलेल्‍या करारात असा क्‍लॉज होता का?
- असे काहीच नाही. बिकीनी घालण्‍यात मला अडचण नव्‍हती, पण त्‍यासाठी तशी चांगली फिगर हवी. सध्‍यातरी माझी फिगर बिकीनी घालण्‍यासाठी परफेक्‍ट आहे असे मला वाटत नाही. माझ्या नकाराचे कारण हेच होते. खरेतर, एक अभिनेत्री म्‍हणून स्‍वत:लाच अनेक मर्यादा घालून ठेवणे चुकीचे आहे आणि मी असे कधीच करणार नाही.

या चित्रपटातून तू स्‍वत:चे मेकओव्‍हर करू इच्छिते का?
- हो. 'प्‍लेअर्स'मध्‍ये माझा हॉट लूक दिसणार आहे. आत्‍तापर्यंत मी अशी भूमिका कधीच केली नव्‍हती. तुम्‍ही याला मेकओव्‍हर म्‍हणू शकता, पण मी तसे म्‍हणणार नाही. माझ्या मते, मी आत्‍तापर्यंत 'टाईप्‍ड' भूमिका केल्‍या नाहीयेत त्‍यामुळे छबी तोडण्‍याचा प्रयत्‍न, वगैरे म्‍हणण्‍याची गरज मला वाटत नाही. पण तरीही, ही भूमिका माझ्यासाठी वेगळीच असेल हे मात्र खरे आहे.

तू स्‍वत:ला मर्यादा घातल्‍या नाहीस. मग, लवकरच सोनम आयटम नंबर करतांना दिसेल का?
- याबाबत मी काय बोलू? मला स्‍वत:लाच मी आयटम नंबर करू शकेन की नाही याविषयी विश्‍वास वाटत नाही. आयटम गर्लसारखे लटके- झटके मारू शकेन की नाही आणि तेही इतरांच्‍या चित्रपटात....मलाच आत्‍मविश्‍वास नाही. माझा जर स्‍वत:चा चित्रपट असेन तरच मी अशी रिस्‍क घेईन.