आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री रुबिना शेरगिलचे निधन

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना शेरगिल हिचे आज दुपारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबिना दम्याची (अस्थमा) रुग्ण होती. ती मागील काही दिवसापूर्वी आजारी होती. तसेच तिला दम्याचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती कोमात गेली होती, त्यामुळे तिला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला होता. मात्र आज दुपारी तिला पुन्हा झटका बसला त्यात तिचे निधन झाले.
रुबिना 'मिस्टर कौशिक की पॉंच बहनियॉ' या मालिकेत काम करीत होती. त्यात ती दुसरया सुनेची (सिमरन) भूमिका साकारत होती. त्यामुळे यापुढे या मालिकेत तिला तिचे कुटुंबिय व चाहते मिस करतील.