आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Salman Khan Was Accused Of Beating Katrina Kaif

कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या सलमान आणि कतरिनाच्या बाबतीत एक वेगळेच गॉसिप सुरु आहे. एका इंग्रजी मासिकाने प्रकाशित केलेल्या बातमीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. इंग्रजी मासिकाने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये 'एक था टायगर' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कतरिना तोकड्या कपड्यांमध्ये सेटवर पोहोचली. कतरिनाला इतक्या छोट्या कपड्यात पाहून सलमानचा राग अनावर झाला. इतकचं नाही तर मागेपुढे न बघता सलमानने चक्क कतरिनाला शिवीगाळ करत तिच्या श्रीमुखात लगावली. सलमानचे हे रुप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
ही घटना घडली त्यावेळी जवळच करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग करत होती. कुण्या एका व्यक्तीने घडलेली घटना करीनाच्या कानावर घातली. करीनाने लगेच तिथे येऊन सलमानचा राग शांत केला.
ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर हे वृत्त चुकीचे असल्याचे सलमान आणि कतरिनाच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. असो, आता खरेखोटे काय हे तर सलमान आणि कतरिनालाच जाणो. मात्र या बातमीमुळे गॉसिपिंगसाठी नवा विषय बॉलिवूडला मिळाला हे नक्की.
PHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान
कॅट म्हणते, सलमान आता तरी लवकर लग्न कर !
IN PICS : विदाउट मेकअप काहीशी अशी दिसते कतरिना
UNSEEN: कतरिना कैफची खाजगी छायाचित्रे झाली लीक !