आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता सोने घ्या चोरीस जाण्याच्या भीतीशिवाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. भारतात बीएसई व एनएसई हे दोन एक्सचेंजेस आहेत. यावर शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे ट्रेडिंग होते. अशाच प्रकारे ज्या म्युच्युअल फंडाच्या युनिटसची खरेदी विक्री बीएसई वा एनएसई एक्सचेंज वर होते. व जो सोन्यात गुंतवणूक करतो, त्याला गोल्ड ईटीएफ अर्थात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड असे म्हणतात. अनेक प्रकारचे गोल्ड ईटीएफ सध्या उपलब्ध आहेत. ते सर्व साधारणपणे सारखाच परतावा देतात. सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे यांच्या किमतीत चढउतार होत असतात. यांनाच पेपर गोल्ड असेही म्हणतात. हा एक अत्यंत पारदर्शी व्यवहार आहे. आपले पैसे सोन्यात गुंतविले जातात व त्याबदल्यात आपल्याला युनिटस दिले जातात. (जे कागदावर असतात) सोन्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी फंड हाऊस वर असते. गरज पडल्यास आपण हे युनिट्स त्या दिवशीच्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे विकून पैसे परत घेऊ शकतो. परंतु यासाठी डिमॅट अकाउंट (खाते) असणे अनिवार्य आहे. तसेच यात एकरकमी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.

ज्या लोकांना डिमॅट अकाउंटचे मेंटेनन्स ब्रोकिंग चाज्रेस भरावयाचे नाहीत, किंवा ज्यांना हप्त्याने (सीप द्वारा) सोन्यात गुंतवणूक करावयाची आहे. त्यांच्यासाठी अजून एक सोपा सुटसुटीत पर्याय उपलब्ध आहे. तो फंड ऑफ फंड्स हा होय.

म्युच्युअल फंड्सच्या फंड ऑफ फंड्स नावाच्या योजनांवर गोल्ड ईटीएफ प्रमाणेच परतावा मिळतो. या योजनाही सोन्यामधेच गुंतवणूक करतात. यांच्यासाठी डिमॅट अकाउंट ची गरज नाही व यात प्रतिमाह 500 रुपयेपासून आपण गुंतवणूक करू शकतो. यामुळे डिमॅट अकाउंट उघडायचा खर्च तर वाचतोच शिवाय सोन्याच्या भावातील चढउताराचा खर्‍या अर्थाने फायदाही मिळतो.

थोड्या नवीन, निराळ्या असल्या तरी गोल्ड ईटीएफ व गोल्डच्या फंड ऑफ फंड स्किम्स या चांगल्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यावर मिळणार्‍या उत्तम परताव्यामुळे तर त्या अधिकच आकर्षक झाल्या आहेत. आपल्या एकूण गुंतवणुकीतली 5 ते 10 टक्के गुंतवणूक ही सोन्यात असणे योग्य समजतात. त्यामुळे पुढच्या वेळेस दागिने करताना सोने घेताना म्युच्युअल फंडच्या फंड ऑफ फंड गोल्ड स्किम्स चा विचार जरूर करा.

abolianand@gmail.com