आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने होणार लाख रुपये तोळा; गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याने खरेदीदार वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय व्यापार जगतातील हालचाली, डॉलरची भाववाढ, युरोपातील वित्तीय पेच, रुपयाचे अवमूल्यन यामुळे महागाई वाढत आहेच. सोनेही त्याला अपवाद नाही. येत्या पाच ते आठ वर्षात एक लाख रुपये तोळा भावाने सोने खरेदी करावे लागणार असल्याचा अंदाज सराफा बाजारपेठेत व्यक्त होत आहे. कमोडिटी मार्केटचे प्रतिनिधीही मोर्चेबांधणी करत आहेत. त्या दृष्टीने अनेक सराफा व्यापा-यांनी गुंतवणुकीची तयारी सुरू केली आहे.
गेल्या पाच वर्षात सोने तोळ्यामागे 10 हजारांवरून 30 हजार रुपये पोहोचले. कोणतीही वस्तू महागडी झाली तर ग्राहकांचा त्याकडील ओढा कमी होतो. पण सोन्याबाबत उलट घडले. सोने खरेदीदारांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कुठपर्यंत पोहोचणार, याविषयी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने सराफा व्यापारांशी चर्चा केली. 20-25 वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या राम वारेगावकर, सुनील उदावंत, राजेश मुथा यांनी लवकरच सोने एक लाखावर पोहोचणार असल्याचे ठामपणे सांगितले. ते म्हणाले, प्रतिवर्षी दहा टक्के नैसर्गिक दरवाढीचा नियम लक्षात घेता 2022 मध्ये एक तोळा सोन्यासाठी 62 हजार रुपये मोजावे लागणार हे स्पष्ट आहेच. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी राहील, असे दिसते. सोन्याच्या महागण्याचा वेग अचंबित करणारा असेल.
कशामुळे येणार झळाळी
* आंतरराष्ट्रीय व्यापार जगतात सोन्याचे महत्व वाढत चालले आहे.
* अर्थव्यवस्था मोडकळीस येत असल्याने अमेरिका सोन्याचा साठा चढ्या भावाने बाजारात आणण्याची शक्यता आहे.
* भारताची लोकसंख्या वाढत चालली असून लग्नसराई, सण-समारंभात वैयक्तिक भेटींच्या रूपात सोन्यावर भर आहे.
* फ्लॅट, बंगला, जमिनीपेक्षा सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर व सुरक्षित आहे.
‘कमोडिटी’चे दूत औरंगाबादेत - कमोडिटी मार्केटचे प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत आले होते. त्यांनीही पाच ते आठ वर्षांत सोने एक लाखावर पोहोचण्याचे संकेत दिल्याचे व्यापा-यांनी सांगितले. हे प्रतिनिधी पुढील महिन्यात विशेष बैठकही घेणार आहेत.
एवढी भाववाढ होणे अवघड - नैसर्गिक वाढीचे सूत्र मान्य केले, आंतरराष्ट्रीय जगताच्या हालचाली अभ्यासल्या तरी 5 ते 8वर्र्षात सोने एक लाख रुपये प्रति तोळा होणे अवघड वाटते.’ - प्रा. डॉ. वंदना सोनाळकर, अर्थतज्ज्ञ, औरंगाबाद
सोने खरेदीची शुभ घडी
जागतिक घडामोडी - कोणत्याही दोन देशातील तणाव, युद्ध, आर्थिक पेच असल्यास सोने महाग होते.
रुपयाचे अवमूल्यन - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाल्यास सोन्यात तेजी.
किमतीवर परिणाम करणारे घटक. यावर लक्ष ठेवल्यास केलेली खरेदी फायद्याची.
तेलाच्या किमती - कच्चे तेल महागल्यास सोनेही महागते. स्वस्त झाल्यास स्वस्त होते.
अमेरिकेचे धोरण - अमेरिकेतील आर्थिक चढ-उतार आणि धोरणावर किमती वर-खाली होत असतात.
मुहूर्त, लग्नसराई - लग्नसराई, दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया या मुहूर्तावर तेजीत. पक्षपंधरवड्यात स्वस्त.
नैसर्गिक आपत्ती - जगात सुनामी, भूकंप, दुष्काळाने नुकसान झाल्यास किमती वर-खाली होतात.
सोन्याचा विक्रमी उच्चांक; दिल्लीत सोने 30,550 या पातळीवर
सोने गुंतवणुकीला येणार सोन्याचे दिवस
सोन्याने भारत सरकारला केले मालामाल
शेअर बाजाराने मारले, तर सोन्याने तारले!