आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचा विक्रमी उच्चांक; दिल्लीत सोने 30,550 या पातळीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । सकारात्मक जागतिक संकेत आणि लग्नसराई यामुळे मागणी वाढल्याने सोन्यात मोठी तेजी आली. तेजीच्या झळाळीने तोळ्यामागे 130 रुपयांची वाढ होऊन सोन्याने 30,550 रुपये ही आतापर्यंतची उच्चांकी भावपातळी गाठली. लंडन बाजारात सोन्याच्या भावात 0.2 टक्के वाढ होऊन भाव औंसमागे 1619.63 डॉलर्सवर पोहोचले.
औद्योगिक क्षेत्रातून चांगली मागणी आल्याने चांदीही तेजीने चकाकली. चांदीचे भाव किलोमागे 100 रुपयांनी वाढून 55,700 रुपयांवर पोहोचले.
जळगावात सोने 30,650 : सोन्याच्या भावात गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने वाढच होत आहे. आज जळगावात भावाने उच्चांक गाठला. सायंकाळी सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 30 हजार 650 रुपये होता. दोन दिवसांत 400 रुपयांनी हे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जूनमध्येही लग्नाचे सात ते आठ मुहूर्त आहेत. यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे. पुढच्या आठवड्यात गुरुपुष्यामृताचा मुहूर्त आहे. यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदी वाढणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
औरंगाबादेत मात्र घसरण : औरंगाबादेत सोन्याच्या भावात तोळ्यामागे 50 रुपयांची घट होऊन भाव 30,550 रुपयांवर पोहोचले. आगामी काळात सोन्यातील भावात चढ-उतार राहतील, असे मत राज्य सराफ महामंडळाचे संचालक दत्ता सावंत यांनी व्यक्त केले.