आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदीच्या तेजीला येणार धार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील अनिश्चित वातावरण आणि भांडवल बाजारातील दोलायमान वातावरणामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मौल्यवान धातूला जास्त मागणी आली आहे. मागणी वाढल्यामुळे वर्षभरात जवळपास 918 टन मौल्यवान धातूची आयात करण्यात आली; परंतु या आयातीमुळे डॉलर मोठ्या प्रमाणावर भारताबाहेर जाऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोने - चांदीबरोबरच प्लॅटिनमवरील अबकारी आणि सीमाशुल्कात वाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली आहे. हि-यांवरदेखील आता 2 टक्के आयात शुल्क आकारण्यात आले आहे. या शुल्कवाढीमुळे केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांमध्ये 600 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
या नवीन बदलानुसार निश्चित रकमेऐवजी सीमाशुल्क आणि अबकारी शुल्क हे मौल्यवान धातूच्या मूल्यावर लावण्यात आले आहे. त्यामुळे मौल्यवान धातूचे मूल्य ज्या प्रमाणात वाढेल त्याप्रमाणात शुल्कही वाढेल. परिणामी सोन्या - चांदीसारखी मौल्यवान धातू अधिक खर्चिक होणार आहेत.
सोन्यावरील आयात शुल्क सध्या प्रतिदहा ग्रॅमसाठी 300 रुपये आहे. पण केंद्र सरकारने या शुल्कात आणखी 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीसाठी 1 हजार 500 रुपये असलेले शुल्क 6 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दहा ग्रॅम सोन्याचा सध्याचा 27 हजार रुपये हा आधारभूत दर मानला तर आयात शुल्कातील वाढ प्रती 10 ग्रॅम जवळपास 540 रुपये होते. त्याचप्रमाणे चांदीचा आधार दर जर 52 हजार रुपये किलो मानला तर एकूण आयात शुल्क जवळपास 3 हजार 120 रुपये होते.
प्रणव मुखर्जी यांनी 2009 - 10 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दहा ग्रॅम सोन्याच्या लगडीवरील आयात शुल्क 100 रुपयांवरून 200 रुपयांवर तर अन्य प्रकारच्या सोन्यावरील (दागिने वगळून) आयात शुल्क 250 रुपयांवरून 500 रुपयांवर वाढवले होते.
त्याचप्रमाणे चांदीवरील सीमा शुल्क किलोमागे 500 रुपयांवरून 1 हजार रुपयांवर नेले. विशेष म्हणजे मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊनदेखील सोने आणि चांदीवरील शुल्काचा 2004 पासून आढावा घेण्यात आलेला नव्हता असे वित्तमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले. 2010 च्या अर्थसंकल्पातही सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात दुस-यांदा वाढ करून ते 200 रुपयांवरून 300 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) तर एक किलो चांदीवरील आयात शुल्क अगोदरच्या 1 हजार रुपयांवरून 1,500 रुपयांवर नेले. केंद्र सरकारला 2010 मध्ये सोन्यावरील आयात शुल्काच्या माध्यमातून 2,836.6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. आयात शुल्क वाढवल्याने सोने-चांदीच्या मागणीत घट होणार आहे.

भाव वधारणार
सोन्यावरील आयात शुल्क सध्या प्रतिदहा ग्रॅमसाठी 300 रुपये आहे; पण केंद्र सरकारने या शुल्कात आणखी 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीसाठी 1 हजार 500 रुपये असलेले शुल्क 6 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दहा ग्रॅम सोन्याचा सध्याचा 27 हजार रुपये हा आधारभूत दर मानला तर आयात शुल्कातील वाढ प्रति 10 ग्रॅम जवळपास 540 रुपये होते. त्याचप्रमाणे चांदीचा आधार दर जर 52 हजार रुपये किलो मानला तर एकूण आयात शुल्क जवळपास 3 हजार 120 रुपये होते.

आयात वाढली
2012 आर्थिक वर्षात देशातील सोन्याची आयात 55 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची अपेक्षा असून त्यामध्ये जास्तीत जास्त 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आयात शुल्कामुळे मागणी कमी होणार
सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात झालेल वाढ ही स्थानिक बाजारपेठेसाठी तरी चांगली बातमी नाही. कारण डिसेंबर महिन्यात अगोदरच सराफ बाजारातील खरेदी काहीशी मंदावली आहे. जानेवारी महिन्यात या खरेदीला थोडीफार चालना मिळण्याची आशा होती; परंतु आता आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे सोने आणखी महाग होणार. त्याचा मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्यास अल्प कालावधीसाठी का होईना, पण ग्राहक थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारतील.
राजेश मेहता, अध्यक्ष, राजेश एक्स्पोर्ट.