आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Manesar Plant Is Close For Police Investigation

‘मारुती’ कारखान्यात टाळेबंदी; चौकशी पूर्ण होईपर्यंत बंद राहील मानेसर प्लांट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मारुती सुझुकी व्यवस्थापनाने शनिवारी आपल्या मानेसर येथील वाहननिर्मिती कारखान्यात अनिश्चित काळासाठी टाळेबंदी केली आहे. बुधवारी झालेल्या हिंसाचाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची खात्री झाल्यानंतरच कंपनी पुन्हा सुरू करण्यात येईल. प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळून पैसे कमावण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे मारुतीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
कंपनीचे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले की, कारचे उत्पादन करून पैसे कमावण्यापेक्षा सहकार्‍यांची सुरक्षा माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. गेल्या तीन दिवसांत मानेसरमधील काम ठप्प असल्यामुळे 210 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मारुती व्यवस्थापनाने या घटनेची चौकशी वेगाने करण्याचा आग्रह हरियाणा सरकारला केला आहे. मारुती सुझुकीही स्वत:कडून स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. प्रकल्पाचे महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) अविनाशकुमार देव यांची हिंसाचारात हत्या झाली होती. भार्गव म्हणाले की, कर्मचारी हिंसाचारावर उतरतील असा विचारही कधी मनात आला नव्हता. प्रत्येक कंपनीत व्यवस्थापन आणि कर्मचार्‍यांत वाद-संप होतच असतात. त्याची परिणती मात्र हिंसाचारात होत नाही. घटनेनंतर 96 कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पैकी 24 कर्मचारी वगळता सर्वांना सुटी मिळाली आहे.
मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाचा दावा
> गतवर्षी झालेल्या संपानंतर कामगारांच्या प्रमुख दोन मागण्या होत्या. पहिली म्हणजे, युनियनची नोंदणी व करारबद्ध कर्मचार्‍यांना नियमित करणे. बहुतांश कर्मचारी कामावर परतले होते, तर अनेकांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली होती.
> करारबद्ध कर्मचार्‍यांना ‘पर्मनंट’ करण्यासाठी धोरण आखण्यात आले होते. या प्रक्रियेवर वेगाने काम करण्यात येत होते.
> वेतनाशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा सुरू होती. सुटीच्या वेतनाचा प्रश्न नव्हता.
> टाळेबंदीदरम्यान कर्मचार्‍यांचे वेतन आदी बाबींवर नियमांच्या आधारेच कारवाई केली जाईल.
2500 कोटींच्या नुकसानीची भीती
मानेसर प्रकल्पात दरमहा 50 हजारांपेक्षा अधिक वाहनांची निर्मिती केली जाते. येथे सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. महिनाभराच्या टाळेबंदीमुळे मारुती सुझुकी इंडियाला तब्बल 2500 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
स्विफ्ट, डिझायरचे वटिंग लांबणार
1700 दैनिक निर्मिती क्षमता असलेल्या मानेसर प्रकल्पात स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, एसएक्सफोर आणि ए-स्टार या कारचे उत्पादन होते. स्विफ्ट व डिझायरची प्रतीक्षा यादी आधीच लांबलेली आहे. टाळेबंदीमुळे ग्राहकांना महिन्यापेक्षाही अधिक काळ ‘वेटिंग’ करावे लागण्याची शक्यता आहे.
मोदींच्या जपानच्या दौर्‍याचे कनेक्शन
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रविवारपासून जपानच्या दौर्‍यावर जात आहेत. तेथे ते सुझुकीचे चेअरमन ओसामू सुझुकी आणि भारतीय युनिटप्रमुख शिंजो नाकाशिकी यांची भेट घेणार आहे. टाटांचा ‘नॅनो’ कार निर्मिती प्रकल्प गुजरातमध्ये आणल्यानंतर मारुतीचा प्रकल्पही आपल्या राज्यात स्थलांतरित करण्याचा मोदींचा मनसुबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मानेसर प्रकल्पातील उत्पादन मारुती सुरळीत करणार
मारुतीच्या मानेसर प्रकल्पात पुन्हा तणाव; उत्पादन खोळंबले