आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ऑल्‍टो आणि मारुती 800 होणार इतिहासजमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात सर्वाधिक विकली जाणारी ऑल्‍टो आणि विक्रीचे रेकॉर्ड बनविणारी मारुती ८०० या कार्सची निर्मिती बंद करण्याचा निर्णय मारुती सुझुकीने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होईल.
या दोन्ही कार्सची निर्मिती बंद करून कंपनी एक नवीन कार बाजारात आणणार आहे. मारुति सुझुकीचे एमडी शिंजो नाकानिसी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, 'नव्या कारच्या निर्मितीचे काम सुरु आहे. नवी कार २०१३ पर्यंत बाजारात येईल. ही कार अधिक माइलेज देईल आणि दिसायलाही आकर्षक असेल.'
नव्या कारचे इंजिन ८०० सीसीचे असणार आहे. यामुळे कारची किंमत कमी ठेवणे शक्य होईल. या कारच्या निर्मितीसाठी कंपनी ५५० कोटी रुपये खर्च करणार आहे. मारुतीसमोर स्पर्धक कंपन्यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. हुंदैच्या इयॉनने बाजारात मोठी झेप घेतली आहे. अशा वेळी स्वस्त आणि आकर्षक मॉडेल आणणे मारुतीला आवश्यकच झाले आहे.
‘एट्रिगा’द्वारे मारुती करणार मल्टी युटिलिटी श्रेणीत एंट्री
मारुती-सुझुकीची झेप गुजरातमध्ये
मारुती : बोलणी फिसकटली, संप सुरूच