आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- लहान मोटारीची उत्पादक म्हणून असलेली प्रतिमा मारुतीने बदलली असून ‘एट्रिगा’ हे त्याचे कदाचित उत्तर असू शकते. मल्टी युटिलिटी वाहनांच्या भाऊगर्दीत शिरकाव करण्यासाठी मारुती पुढील वर्षात बाजारात ‘एट्रिगा’ हे पहिलेवहिले बहुउद्देशीय वाहन दाखल करत आहे. जानेवारीमध्ये नवी दिल्लीत होत असलेल्या आॅटो शोमध्ये मोटारप्रेमींना या नवीन वाहनाची झलक बघता येणार आहे.
देशातील वाहन उद्योगामध्ये युटिलिटी वाहनांचा वाटा जवळपास 15 टक्के असून मल्टिपर्पज व्हेईकल अर्थात बहुउद्देशीय वाहनांचा वाटा 9 टक्के आहे. मोटार निर्मितीमध्ये आघाडीवर असतानाही मारुती सुझुकी आतापर्यंत या वाहनांपासून दूर होती; परंतु ‘एट्रिगा’च्या माध्यमातून 2015 पर्यंत प्रवासी वाहन बाजारपेठेतील 50 टक्के हिस्सा काबीज करण्याचे लक्ष्य मारुतीने ठेवले आहे.
एसयूव्ही, एमपीव्ही आणि एमयूव्ही या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आम्ही नसलो तरीही आमच्या स्पर्धक कंपन्यांना नक्कीच आव्हान निर्माण करू, असा विश्वास मारुती सुझुकी इंडिया लि.च्या विपणन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.