आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसदारांसाठी...!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. पशूसारखा तो एकटा राहूच शकत नाही. आपण भारतीय कुटुंबप्रिय आहोत. त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्वात मोठी प्राथमिकता आपल्या कुटुंबाला सुख-सुविधा कशा देता येतील यासाठी आपण आयुष्यभर झटत असतो. शिक्षण संपल्यावर कमवायची चिंता, नंतर योग्य ठिकाणी गुंतवणुकीची चिंता आणि शेवटी आयुष्यभर कमावलेले आपल्या वारसदारांना कसे मिळेल याची चिंता असते. म्हणूनच ‘वन मस्ट डाय विथ शूज ऑन’ असे म्हणतात.
आयुष्यभर काम करावे, कर्मयोगी व्हावे, निवृत्त झाल्यावर उत्सव साजरा करण्याऐवजी पुनश्च नवीन जोमाने नवीन काहीतरी करण्याची उमेद घेऊन काम करायला हवे. (आयुष्यात सर्व ठिकाणी मुक्त पैशासाठीच काम करण्याऐवजी निवृत्तीनंतर आपल्या अनुभवाने नवीन पिढीला मार्गदर्शन देण्यासारखे पुण्य नाही हे लक्षात घ्यावे) आपल्या पश्चातसुद्धा आपले कुटुंबीय सुखात राहावेत यासाठी आपण कमावलेल्या आणि त्याद्वारे निर्माण केलेल्या संपत्तीचे हस्तांतर पुढच्या पिढीला मृत्युपत्राद्वारे (विल ) करणे हेसुद्धा प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
मोठमोठ्या उद्योगपतींच्या मृत्यूनंतर किंवा सर्वसामान्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी वारसदारांमध्ये होणारी भांडणे आजकाल नवीन नाहीत. आज कोर्टात त्यासाठी प्रचंड केसेस प्रलंबित आहेत. वेळप्रसंगी वारसदारसुद्धा हयात नसतात आणि संपत्ती अशाच पद्धतीने पडून राहते. प्रत्येक कमावत्या व्यक्तीने आपल्या हयातीत आपले मृत्युपत्र बनवायला हवे आणि त्यासाठी प्रत्येक गुंतवणूक सल्लागाराने पुढाकार घेण्याची गरज आहे. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही मानसिकदृष्ट्या सक्षम आणि स्वस्थ व्यक्ती मृत्युपत्र बनवू शकते. मुळात त्यासाठी त्या व्यक्तीला ते वाचवून दाखवायचे, सोबत दोन साक्षीदार, त्यांचे नाव व पत्ते, स्वाक्षरी आणि संपत्तीधारकाचा अंगठा अथवा स्वाक्षरी पुरेसे आहे. मृत्युपत्र कोणत्याही भाषेत बनवता येते, साक्षीदारांची सही आणि उपस्थिती आवश्यक असून मृत्युपत्र ज्या भाषेत आहे, त्या भाषेची ओळख त्यांना हवी. मृत्युपत्राच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक आणि मृत्युपत्रधारकांची सही असावी. स्वाक्षरी केल्याची तारीख व गावाचे नाव हवे. मृत्युपत्र करणाºया व्यक्तीचे पूर्ण नाव व पत्ता हवा. मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी डॉक्टरचे पत्र किंवा साक्षीदार म्हणून डॉक्टर असल्यास उत्तम, वकीलही चालतो.
मृत्युपत्र बनवताना मी माझे यापूर्वीची सर्व मृत्युपत्रे रद्द करीत असून हे माझे शेवटचे मृत्युपत्र असल्याचा उल्लेख मृत्युपत्रात अवश्य करावा. मृत्युपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी विश्वासू नातेवाईक, वकील, आपला सल्लागार ऑडिटर इतर कोणत्याही विश्वासू व्यक्तीची निवड करून त्यांचे नाव, पत्ता टाकून त्यांची नेमणूक करावी. मृत्युपत्र बनवल्यानंतर जर यदाकदाचित नवीन संपत्ती निर्माण झाली तर ती कशी हस्तांतरित होईल याचासुद्धा उल्लेख असावा. मृत्युपत्र कागदावरसुद्धा लिहिता येते. ते टाइप करताना रजिस्टर्डच पाहिजे असा कायदा नाही. परंतु त्यावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी, नाव व पत्ता आवश्यक आहे. मृत्युपत्रात स्थावर मिळकत, उदा. घर, गोडाऊन, फॅक्टरी, ऑफिस तसेच शेती याशिवाय बॅँकेतील ठेवी, इतर डिपॉझिट्स, शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, बॉँड्स, इतर वित्तीय गुंतवणूक, कॅश, सोने, ज्वेलरी, डायमंड्स, मूल्यवान धातू, महागडी पेंटिंग्ज, विमा पॉलिसी, येणारी रक्कम, गाड्या, क र्ज, रिपेमेंट आणि इतर मिळकत यांचा उल्लेख हवा. संपत्तीचे वाटप वारसदारांना कशा पद्धतीने व्हायला हवे याची माहिती मृत्युपत्रात हवी. एकापेक्षा जास्त वारसदार असल्यास कोणाला किती हिस्सा द्यावयाचा याचा उल्लेख हवा. मृत्युपत्र झाल्यानंतर विश्वासू, ओळखीच्या व्यक्तीच्या हातात अथवा आपल्या लॉकरमध्ये मूळ प्रत ठेवावी. एक -एक प्रत साक्षीदारांना द्यावी. जास्त विस्तृत माहिती जागेअभावी देता येणे शक्य नसल्याने वकिलांचा किंवा गुंतवणूकदारांचा सल्ला घेऊन कार्यवाही करावी. मृत्युपत्र रजिस्टर्ड केल्यानंतर त्रास होत नाही.
वर्तमानकाळात विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला असल्याने आपण आपल्या संपत्तीचे नियोजन आपल्या हयातीत व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी या कालांतराने एक कायदेशीर डॉक्युमेंट ठरते. वकिलांच्या सही-शिक्क्याने त्याचे महत्त्व वाढते. चांगले नावाजलेले वकील आणि गुंतवणूक सल्लागाराच्या सान्निध्यात राहून नवीन अशील वाढवतात आणि सल्लागारसुद्धा आपला व्यवसाय वाढवू शकतात. वित्तीय क्षेत्र बदलते आहे. वित्तीय नियोजन, संपत्ती आणि नियोजन आणि आयुष्यात मृत्युपत्राचे महत्त्व ओळखूनच बदलणाºया वातावरणात जे स्वत:ला बदलतात तेच कालांतराने आपल्या कुटुंबाला सुखी करतात. भविष्यात आपणास, कुटुंबीयांना आणि वारसदारांना त्रास होऊ नये अशी आपली इच्छा
असल्यास आजच आपल्या संपत्तीचे नियोजन व्यवस्थित करण्यासाठी मृत्युपत्र करावे आणि अशाच सल्लागाराच्या संपर्कात राहावे. बघा, पटतंय का ..?
- iudit@sify.com