आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार उत्पादनाला ब्रेक ; मारुती लवकरच करणार उत्पादनात कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कार निर्मिती कंपन्यांना विक्रीच्या रस्त्यावर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल कारच्या विक्रीत मोठी घट येत आहे. त्यातच वितरकांकडील कारच्या इन्व्हेन्टरी लेव्हलमध्ये अधिकच वाढ झाली आहे. अनेक सवलतींचे आमिष दाखवूनही पेट्रोल कारच्या विक्रीत वाढ होत नसल्याचे चित्र आहे. या स्थितीत प्रमुख कार निर्मात्या कंपन्यांना आपल्या उत्पादनावर ब्रेक लाववा लागणार आहे. देशातील प्रमुख कार निर्मात्या कंपन्यांच्या अधिका-यांनी आगामी काही आठवड्यात कंपन्यांकडून उत्पादन घटवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक शहरातील मारुती वितरकांकडे पेट्रोल कारच्या इन्व्हेंटरी लेव्हल मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. त्यातच आकर्षक सवलती आणि विविध ऑफर्सचे आमिष दाखवूनही पेट्रोल कारची विक्री वाढत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत कंपनीला लवकरच आपल्या काही मॉडेल्सचे उत्पादनात कपात करावी लागेल किंवा काही कारचे उत्पादन थांबवावे लागणार आहे. येत्या काही आठवड्यातील परिस्थिती लक्षात घेऊन उत्पादन कपातीबाबत निर्णय होणार आहे.
टाटा मोटार्स लिमिटेडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने काही दिवसांपूर्वीच काही कारचे उत्पादन कमी केले आहे. टाटा मोटार्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमचे उत्पादन धोरण लवचीक आहे. मागणी तसे उत्पादन असे आमचे धोरण आहे. जनरल मोटार्सचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी सांगितले की, सध्याची स्थिती कार कंपन्यांसाठी अत्यंत वाईट आहे. पेट्रोल कारची विक्री कमी झालेली आहे. त्यातच रूपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रामाणात होत आहे, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा मोठा दबाव आहे. उत्पादन कपातीबाबत ते म्हणाले की, आम्ही जस्ट इन टाइम (जेआयटी) इनव्हेंटरी पद्धतीनुसार काम करतो. जशी मागणी तसे उत्पादन या सूत्रानुसार उत्पादन होते. दुस-या एका कार कंपनीच्या अधिका-याने सांगितले की, काही कंपन्यांनी पेट्रोल उत्पादनात कपात करण्यास प्रारंक्ष केला आहे. त्याशिवाय काही कंपन्या आगामी काळात उत्पादनात कपात करण्याच्या विचारात आहेत.
वाईट परिस्थिती - आकर्षक सवलती आणि विविध ऑफर्सचे आमिष दाखवूनही पेट्रोल कारची विक्री वाढत नसल्याचे चित्र
कंपन्यांची अडचण - अनेक शहरातील मारुती वितरकांकडे पेट्रोल कारच्या इन्व्हेंटरी लेव्हलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे.