आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरबीआयचे संकेतः संधी व्याजदर कपातीची..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या आर्थिक विकासदराने नऊ वर्षांचा नीचांक गाठल्यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेच्या चिंता वाढवल्या आहेत, परंतु जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे आता शिखर बॅँकेला व्याजदरात कपात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
आर्थिक वृद्धीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ झालेली असली तरी सकारात्मक ठरणार असून त्याचा मुख्य चलनवाढ कमी होण्याच्या दृष्टीने परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत देखील अंदाजापेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आहे. या दोन्ही गोष्टींमुळे व्याजदरात कपातीची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे संकेत रिझर्व्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी दिले.
मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत आर्थिक विकासदरात लक्षणीय घसरण होऊन तो 5.3 टक्क्यांच्या गेल्या नऊ वर्षांतील नीचांकी पातळीवर आला. घसरलेल्या आर्थिक विकासदराला पुन्हा रुळावर आणून निर्धारित 7.3 टक्के आर्थिक वृद्धीचे लक्ष्य गाठण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे ठरले.
2011 - 12 आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा घसरून 6.5 टक्क्यांवर आला. विशेष म्हणजे लिहमन ब्रदर्सच्या पडझडीच्या काळानंतरच्या 6.7 टक्के आणि आर्थिक वर्ष 2011 मधील 8.4 टक्क्यांच्या तुलनेतही हा विकासदर नीचांकी पातळीवर आला आहे.
महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या कडक आर्थिक उपाययोजनांमुळे जवळपास 20 महिने देशातील चढे राहिलेले व्याजदर हे देखील विकासदराच्या घसरणीला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
महागाईत झालेली घट लक्षात घेऊन विकासाला चालना देण्यासाठी शिखर बॅँकेने एप्रिल महिन्यातील आपल्या वार्षिक पतधोरणात व्याजदरात अर्धा टक्क्याने कपात करून सुखद धक्का दिला, परंतु वाढती वित्तीय तूट आणि चालू खात्यातील फुगलेली तूट लक्षात घेता यापुढे आणखी व्याजदरात कपात करण्यास फारशी संधी मिळणार नसल्याचे संकेतही शिखर बॅँकेने त्याचवेळी दिले होते.
कपातीच्या मार्गात अनेक अडथळे :
मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत आर्थिक विकासदरात लक्षणीय घसरण होऊन तो 5.3 टक्क्यांच्या गेल्या नऊ वर्षांतील नीचांकी पातळीवर आला. एप्रिल महिन्यातील आपल्या वार्षिक पतधोरणात व्याजदरात अर्धा टक्क्याने कपात करून सुखद धक्का दिला, परंतु वाढती वित्तीय तूट आणि चालू
खात्यातील फुगलेली तूट लक्षात घेता यापुढे आणखी व्याजदरात कपात करण्यास फारशी
संधी मिळणार नसल्याचे संकेतही शिखर बॅँकेने त्याचवेळी दिले होते.

कच्चे तेल स्वस्त झाल्याने आशेचा किरण
काही गोष्टी व्याजदर कपातीकडे अंगुलिनिर्देश करीत असल्या तरी चलनवाढीचा ताण अद्याप कायम आहे. त्यामुळे या गोष्टी समतोल कशा होतील यावर विचार करावा लागेल. कच्च्या तेलाची रुपयातील किंमत किंचितशी घसरली असून ती गेल्या आठ महिन्यांत पहिल्यांदाच प्रती बॅरल 100 डॉलरच्या खाली गेली आहे. ही घट रुपयाच्या अवमूल्यनाच्या तुलनेत जास्त असल्याचेही गोकर्ण यांनी सांगितले. चालू खात्यातील वाढती तूट, वाढती वित्तीय तूट आदी विविध कारणांमुळे गेल्या 12 महिन्यांत रुपयाचे मूल्य जवळपास 20 टक्क्यांनी घसरले आहे.

महागाईचा खो अन् रुपयाची घसरण
जीडीपीचा घसरलेला दर, उत्पादन क्षेत्राची खालावलेली कामगिरी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता 18 जून रोजी जाहीर होणाºया मध्यावधी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅँक कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. व्याजदरात कपात करण्याच्या दृष्टीने शिखर बॅँकेला आशेचा किरण दिसलेला असला तरी अन्नधान्याची वाढती महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन या दोन गोष्टी त्यामध्ये खो घालू शकतात. त्यामुळे या दोन गोष्टींवर शिखर बॅँकेचा निर्णय अवलंबून असेल याकडेही गोकर्ण यांनी लक्ष वेधले.
पतधोरण नको, आर्थिक वाढ आणि महागाई वाढ हवी...
महागाई असूनही भारतात कोट्यधीशांची संख्या वाढली
महागाई दर घटला तरी बाजारात भाववाढीचे चटकेच