आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉलमार्टचे एक स्टोअर जरी उघडले, तरी त्याला आग लावीन- उमा भारती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने मल्टी व सिंगल ब्रँड मध्ये थेट परकीय गुंतवणूकीला ( एफडीआय) परवानगी दिल्याने येत्या तीन वर्षात देशात सुमारे एक कोटी रोजगार निर्माण होतील. तसेच छोट्या व स्थानिक रिटेलर्सना याचा फटकाही बसणार नसल्याचे वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
गुरुवारी केंद्र सरकारने संसदेत मल्टी आणि सिंगल ब्रँडमध्ये अनुक्रमे ५१ व १०० टक्के एफडीआयला परवानगी दिली. त्यामुळे वॉलमार्ट, टिस्को आणि कॅरीफोर यासारख्या बड्या रिटेल कंपन्या भारतात गुंतवणूकीसाठी येतील, असा दावा करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकार शेती उत्पादनाबाबत नवीन धोरण तयार करेल. तसेच हे उत्पादन कोणत्याही ब्रँडशिवाय विकले जाईल, असे धोरण बनविले जाईल.
उमा भारती सरसावल्या
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी शेती व रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, जर उत्तर प्रदेशात एक जरी वॉलमार्टचे स्टोअर उघडले तर मी स्वत: त्याला आग लावीन. भलेही मला तुरुंगात जावे लागले, तरी हरकत नाही. पंतप्रधानांनी गरीब लोकांची रोजी-रोटी हिसकवण्यासाठीच हा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप भारती यांनी केला.'वॉलमार्ट', 'कार्पोरेट अमेरिके'कडून मल्टी ब्रँड 'एफडीआय'चे स्वागत; संसदेत मात्र विरोध
रिटेल क्षेत्रात 51% विदेशी गुंतवणुकीला परवानगी; वॉलमार्ट, टेस्कोसाठी भारताची दारे खुली