आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराने मारले, तर सोन्याने तारले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भांडवल बाजाराच्या लहरी स्वभावामुळे गेल्या वर्षभरात जवळपास 1 दशलक्ष डॉलर्सचा तोटा सहन केल्यानंतर आता भांडवल बाजारातील तज्ज्ञही ताक फुंकून फुंकून पिऊ लागले आहेत. नव्या वर्षात सेन्सेक्सचा कल काय असेल याबद्दल तज्ज्ञांनी विविध अंदाज व्यक्त केले आहेत. ब-याच जणांनी 2012मध्ये सेन्सेक्स किमान 8,000 तर कमाल 28,500 अंकांच्या पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षात सेन्सेक्स 15,454.92 अंकांच्या पातळीवर बंद झाला. परंतु भांडवल बाजाराबद्दल नवीन वर्षात व्यक्त केलेल्या अंदाजाचा वेध घेता बाजारमूल्य सध्याच्या पातळीत अर्ध्याहून अधिक किंवा कदाचित दुपटीने खाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या वर्षात शेअर्सने मारले पण सोन्याने तारले अशी अवस्था गुंतवणुकदारांची झाली होती. भांडवल बाजारात प्रचंड चढ-उतार असताना सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षिततेची मानल्या गेली. त्याचप्रमाणे नवीन वर्षातही सोन्यासारख्या महत्त्वाच्या मालमत्ता वर्गात तेजी येण्याबद्दल विश्लेषक जास्त आशावादी आहेत.
2011 सुरु होतान 20,890 रुपयांच्या पातळीवर असलेला दहा ग्रॅम सोन्याचा भाव वर्षाच्या अखेरीस 27 हजार 640 रुपयांवर बंद झाला. तर दुस-या बाजुला एक किलो चांदीचा भावाने 46 हजार 500 रुपयांवरून 51 हजार 150 रुपयांवर उडी मारली. टक्केवारी स्वरुपात सांगायचे तर शेअर बाजार वर्षभरात 24.6 टक्क्यांनी घसरला पण सोन्याच्या भावात 32 टक्क्यांनी तर चांदीच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली.
सरलेल्या वर्षात सेन्सेक्स 5,054.92 अंकांनी घसरून 15,454.92 अंकांवर बंद झाला. याचाच अर्थ गुंतवणुकदारांची एकूण मालमत्ता तब्बल 19.46 लाख कोटी रुपयांनी घसरून 53,48,644.8 कोटी रुपयांवर आली. या वर्षात शेअर बाजारात प्रत्येक 10 सेकंदाला सरासरी एक दशलक्ष डॉलरचा तोटा झाला. रेलिगेअर सिक्युरिटीजचे सीईओ गागन रणदेव म्हणाले की, बाजारातील दोलायमान स्थिती किमान अल्पमुदतीत तरी कायम राहण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीनंतर सेन्सेक्सचा चढता राहून सेन्सेक्स 18,000 अंकावर जाण्याचा अंदाज आहे.
* 2008प्रमाणे वैश्विक बाजारातील सध्याची अनिश्चितता कायम राहील. युरोपचा झटका आशियाला बसण्याची शक्यता आहे. परंतु दीर्घ काळातील भारतीय कंपन्यांची वाढती कमाई बाजाराला लाभदायक ठरू शकते. सेन्सेक्स 28,500 ची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकाळात आपल्या रोखासंग्रहाची विचारपूर्वक रचना करावी. - अजित दयाल, संचालक, क्वांटम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी.
* रुपयाचे अधिक अवलमूल्यन होऊन बाजारातील तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 11,000 ते 12,000 अंकांच्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 60 रुपयांच्या पातळीवर आला तर विक्री होऊन सेन्सेक्स या पातळीवर येईल. - सीएलएसए, जागतिक पातळीवरील संशोधन संस्था