आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्याजदर कपातीच्या आशेचा शेअर बाजारावर शिडकावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठलेला गेल्या 16 महिन्यांतील नीचांक, डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या सकारात्मक घडामोडींबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे 18 जूनला जाहीर होणा-या रिझर्व्ह बॅँकेच्या मध्यावधी पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात होण्याबद्दल निर्माण झालेली आशा यामुळे बाजारात खरेदी होऊन सेन्सेक्स 23.24 अंकांनी वधारला.
वास्तविक पाहता सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त घसरून पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत गेला होता; परंतु नंतर झालेल्या खरेदीत सकाळच्या सत्रातील घसरण भरून निघाली. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स 470 अंकांनी घसरला होता; परंतु लार्सन अ‍ॅँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बॅँक तसेच अन्य बॅँकांच्या समभागांच्या खरेदीमुळे या घसरण मोडून निघाली.
आशियाई शेअर बाजारातील नरमाईमुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक उघडल्यावर 156 अंकांनी घसरला. त्यानंतर त्याने 15,748.98 अंकांचा गेल्या पाच महिन्यातील नीचांक गाठला, परंतु नंतर दिवसभरातील सकारात्मक घटनांमुळे सेन्सेक्सच्या पातळीत सुधारणा होऊन सेन्सेक्स दिवस अखेर 23.24 अंकांनी वधारून 15,988.40 अंकाच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 6.55 अंकांनी वाढून 4848.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बाजारात नरमाईचे वातावरण असतानाच रिझर्व्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी आर्थिक विकासाचा घटता आलेख आणि कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती यामुळे व्याजदरात कपात करण्यास संधी असल्याचे संकेत दिल्यामुळे बाजाराला नवसंजीवनी मिळाली. त्यातच रुपया डॉलरच्या तुलनेत 55.20 रुपयांनी बळकट झाल्याची भर पडली. भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, तेल आणि वायू, बॅँका, वाहन या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले, परंतु ग्राहकोपयोगी वस्तू आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना मात्र विक्रीचा फटका बसला.
बाजारातील सध्याचे वातावरण बघितले तर सध्या समभागांचे मूल्य आकर्षित असून भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत अ‍ॅम्बिट कॅपिटलचे समभाग प्रमुख सौरभ मुखर्जी यांनी व्यक्त केले.
गेल्या आठवड्यात वॉलस्ट्रीट शेअर बाजारातील मरगळीचे वातावरण असल्यामुळे आशियाई शेअर बाजारात लक्षणीय घसरण झाली. परिणामी चीन, हॉँगकॉँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान बाजार गडगडले. दुपारच्या सत्रात युरोप शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते.
कच्‍च्‍या तेलाचे बाजारातील वास्‍तवः सरकार दरवाढ घेईल का मागे?
पेट्रोल मिळते 3 ते 18 रुपये लिटर!