आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tata Becomes Highest Atm Machine Service Provider

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटा बनली सर्वात मोठी एटीएम सेवा पुरवठादार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टाटा कम्युनिकेशन्सच्या संपूर्ण मालकीच्या असलेल्या टाटा कम्युनिकेशन्स बँकिंग इफ्रासोल्यूशन्स (टीसीबीआयएल) या बँकिंग आणि वित्तसेवा क्षेत्रातील प्रदानातील उपाययोजनांमधील विशेष असलेल्या कंपनीला देशातील सर्वात मोठी एटीएम सेवा पुरवठादार होण्याचा मान मिळाला आहे.
या कंपनीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्रप्रदेश तसेच पुदुच्चेरीमधील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 14,000 एटीएम सुरू करून त्याचे व्यवस्थापन करण्यासंबंधीचा करार केला आहे. हे शिखर गाठतानाच सर्वात मोठी प्रबंधित एटीएम सेवा पुरवठादार कंपनी ठरली असून त्यात देशभरात 27,000 हजार एटीएमच्या कराराचाही समावेश आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एटीएमचे जाळे वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होताना कंपनीला खूप आनंद होत आहे. त्यातून अवघ्या तीन वर्षांपूर्वी बँकिंग इन्फ्रासोल्यूशन्सच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मिळालेली ही मोठी संधी टीसीबीआयएलकडून बँकिंगशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींसाठी एक चांगला उपाय ठरेल. आम्ही त्यांच्या ब्रँड मार्गदर्शक तत्त्वांनुसार एटीएमसाठी जागा बघण्यापासून ते एटीएमचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणार असल्याचे मत टाटा कम्युनिकेशन्स बँकिंग इफ्रासोल्यूशन्स लिमिटेडचे अध्यक्ष सुदीप कुमार यांनी व्यक्त केले.
येत्या दोन वर्षांच्या कालावधीत टाटा कम्युनिकेशन्स 14000 एटीएम्सची स्थापना व त्यांचे व्यवस्थापन करणार असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 21 बँकांचा समावेश आहे. यांपैकी जवळ-जवळ 50 टक्के एटीएम निम-शहरी व ग्रामीण क्षेत्रांमध्ये स्थापित करण्यात येतील. तसेच बाकी 50 टक्के एटीएम महानगरे व शहरी क्षेत्रांमध्ये स्थापित करण्यात येतील असेही ते म्हणाले.