आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन- भारत सरकारने मल्टी ब्रँड कंपन्यांना ५१ टक्के व सिंगल ब्रँड कंपन्यांना १०० टक्के थेट गुंतवणूकीला परवानगी दिल्याने वॉलमार्ट कंपनी व अमेरिकेतील कार्पोरेट क्षेत्राने स्वागत केले आहे. तसेच यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल तसेच या क्षेत्रात हजारो रोजगार उपलब्ध होतील.
या निर्णयामुळे भारतातील कृषी बाजारपेठ आधुनिक व विस्तुत प्रमाणात वाढेल, असा विश्वास अमेरिका-भारत बिझनेस कौन्सिलचे प्रमुख रोन सोमर यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे आता शेती ते बाजार येथे साखळी पध्दतीने गुंतवणूक करण्यास वाव मिळेल. अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहतील व महागाई कमी राहण्यास मदत मिळेल.
यामुळे भारतातील शेतकऱयांना एक मोठी बाजारपेठ मिळेल व गुणवत्ता वाढविल्यास चांगल्या ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी त्यांना मिळेल व त्यामुळेच याचा शेतकरयांना फायदाच होईल, असे सोमर यांनी म्हटले आहे.
वॉलमार्टकडून स्वागत
जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट कंपनीने भारत सरकराने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच हा निर्णय म्हणजे रिटेल क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे सांगितले. मात्र, आपण भारतात कसा बिझनेस करायचा याचा अभ्यास करुनच तेथे जाऊ. जर तेथे बिझनेस करण्यासारखी स्थिती असेल तरच आम्ही गुंतवणूकीचा विचार करु, भारती-वॉलमार्टचे एमडी व सीईओ राज जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला असून संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
रिटेल क्षेत्रात 51% विदेशी गुंतवणुकीला परवानगी; वॉलमार्ट, टेस्कोसाठी भारताची दारे खुली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.