आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zerodha Provides Online Brokerage Apps On Mobile

मोबाईलवर करा शेअर खरेदी विक्रीचे व्‍यवहार, झेरोधा कंपनीने विकसित केली प्रणाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोणत्याही अडथळयाशिवाय तुम्हाला तुमच्या मोबाइलवर किंवा आयफोनवर शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार कमाल 20 रुपये शुल्क आकारून करु देणारी प्रणाली झेरोधा या बेंगळुरूमधील ऑनला इन ब्रोकरेज कंपनीने विकसित केली असून तीन वर्षात दिवसाला चार हजार कोटी रुपये व्यवहाराचा टप्पा कंपनीने गाठला आहे अशी माहिती संस्थापक आणि मुख्याधिकारी नितीन कामत यांनी पत्रकारांना दिली.

बेंगळुरूस्थित ही कंपनी आता पुणे आणि मुंबईत विस्तार करणार असून येत्या काही महिन्यात दोन्ही शहरात सेवा सुरु करणार आहे. कामत म्हणाले, की बाजारातील ट्रेडरला नेमके काय हवे ते ओळखून सर्वात स्वस्त सेवा आम्ही 2010 मध्ये सुरु केली आणि अल्पवधीत आमची उलाढाल चार हजार कोटी रुपयावर गेली आहे. सध्या हैद्राबाद, कोची, अहमदाबादसह सहा शहरातील गुंतवणूकदार आमची सेवा घेत आहेत. पुण्यातील ग्राहक संख्या सध्या एक हजार असून ती पाच हजारापर्यंत वाढविली जाणार आहे. पुण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी कर्मचारी संख्या असल्याने त्याचा फायदा आम्हाला होईल.

गेल्या तीन वर्षात शेअर बाजाराची स्थिती निराशाजनक असूनही कंपनीला इतका व्यवसाय मिळला यावरून कंपनीची विश्वासार्हता सिध्द झाली आहे. 150 जणांशी कंपनीने सहकार्य करार केला आहे. सध्या कंपनीचे 30 हजार ग्राहक असून राष्ट्रीय शेअर बाजारावर सर्वात वेगाने वाढणारी कंपनीची ब्रोकिंग सेवा आहे.


विकसित देशात उपलब्ध असलेली अल्गोरिथम आधारित व्यवहार पद्धती कंपनीने येथे सुरु केली आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील सामान्य गुंतवणूकदार सहभाग किमान दहा वर्षे मागे आहे तो वाढण्यासाठी ऑनला इन सुविधा उपयोगी ठरणार आहे. वाढता मध्यमवर्ग आणि सरासरी 40 वय असलेले टेक सॅव्ही लोक हे त्यामागचे कारण आहे. येत्या काही महिन्यात कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेडिंग सुविधा निर्माण करणार आहे. झेरोधाने गेल्या आर्थिक वर्षात 12 कोटी रुपये करपूर्व नफा मिळविल्याचे कामत यांनी सांगितले.

छायाचित्र- नितीन कामत