आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remorseful Sonam Kapoor Won’t Repeat Her Mistakes, Right?

खरंच सोनम भोळीभाबडी मुलगी आहे ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सहकलाकारांना कमी लेखण्यासाठी ट्विटरवर वाट्टेल ती कमेंट देणा-या सोनमचे डोके ठिकाणावर आले, असे बोलले जात आहे. अनिल कपूरच्या या लाडक्या लेकीने आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, ''मला माझे तोंड बंद ठेवायला हवे आणि कोणावरही कमेंट करायला नको. स्पष्टवादी होण्यापेक्षा मला डिप्लोमेटिक व्हायला हवे. येथे प्रामाणिक असणे चांगले नाही असे गेल्या वर्षभरात मला जाणवले आहे. माझे वडील डिप्लोमेट बनून राहिले, त्यांच्याकडून मी हा गुण घ्यायला हवा. मात्र मी खरंच भोळी आणि आदर्शवादी आहे.''

कांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमने कतरिनाला टार्गेट करत एका पत्रकाराला म्हटले होते की, "माझी कतरिनाला एक गुलदस्ता द्यायची इच्छा आहे." आता सोनमला कसे का करायचे आहे, हे विचारल्यावर तिने उत्तर दिले की, "मला कळत नाही की तिला हे सगळे कसे काय जमते. हे सगळे करत असतांना तुमच्याजवळ एक विशेष प्रकारची कमिंटमेंट आणि निर्लज्जपणा असावा लागतो." या वक्तव्यानंतर सोनम बरेच दिवस चर्चेत राहिली. याआधीही सोनम आपल्या अशाच प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली होती. आपल्या एका चाहत्याला तिने ट्विटरवर शिवीगाळ केली होती.

सोनमचे वडील अनिल कपूर यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, स्टार किड्सना भरपूर संघर्ष करावा लागतो. यावर सोनमच्या एका चाहत्याने ट्विट केले होते की, स्टार किड्सकडे प्रतिभा नसते. यावर चिडून सोनमने प्रतिउत्तर देतांना "f*** off" असे ट्विट केले होते. आता मात्र सोनमचे डोके ठिकाणावर आले आहे आणि तिने आपल्या वडिलांसारखे वागायचे ठरवले आहे.
सोनम कपूरचा बॉयफ्रेन्‍ड कोण ते जाणून घ्‍यायचेय?
सुडौल बांधा झाल्यास बिकिनीचा विचार - सोनम
स्‍वत:च्‍या चित्रपटात आयटम नंबर करेन- सोनम कपूर