आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिनाथ मूर्ती संरक्षणासाठी आता केमिकलचा लेप

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडवानी - जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध भगवान श्री आदिनाथ यांच्या ८४ फूट इंच मूर्तीला आता अनब्रेकेबल काचेने झाकले जाणार नाही. प्रतिमेच्या संरक्षणासाठी आता आॅस्ट्रेलियाहून मागवण्यात आलेल्या विशेष रसायनाचा लेप चढवला जाणार आहे. गुजरातमधील अभियंत्यांच्या निरीक्षणाखाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. दिगंबर जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या चूलगिरी बावनगजा इथल्या या धर्मस्थळाचे अध्यक्ष राजकूमार जैन आणि व्यवस्थापक इंद्रजित मंडलोई यांनी सांगितले की, अहमदाबादच्या अभियंत्यांनी मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर अनब्रेकेबल काच न लावण्याची सूचना केली होती. अशी काच लावल्यामुळे मूर्तीचे पौराणिक महत्त्व कमी होईल, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
काचेचा निर्णय अभिषेकासाठी
मूर्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या गांधीलमाशांमुळे मूर्तीला महामस्तकाभिषक करण्यात अडचणी येत असल्याने मूर्तीला अनब्रेकेबल काचेचे आवरण चढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता लावणार रसायन
मूर्तीच्या सुरक्षेसाठी काचेचे आवरण काढून टाकल्यानंतर आता खास आॅस्ट्रेलियाहून मागवण्यात येणारे रसायन वापरण्यात येणार आहे. या विशेष रसायनाचा लेप आता मूर्तीवर चढवण्यात येणार आहे. अँटी-बी नामक हे विशेष रसायन लावल्यामुळे गांधीलमाशांचा समूह मूर्तीवर येणार नाही. हे रसायन लावल्यामुळे मूर्तीची कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच रसायनाचा लेप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी आहे मूर्ती
प्रतिमेची उंची- ८४ फूट
एका भुजेपासून दुसºया भुजेपर्यंत -२६ फूट ६ इंच
भुजेपासून बोटापर्यंतचे अंतर- ४६ फूट २ इंच
कमरेपासून गुडघ्यापर्यंत-४७ फूट
डोक्याचा घेर-२६फूट
पायांची लांबी-३६ फूट ९ इंच
नाकाची लांबी-३ फूट ११ इंच
डोळ्यांची लांबी- ३ फूट ३ इंच
कानांची लांबी- ९ फूट ६ इंच
एका कानापासून दुसºया कानापर्यंत- १७ फूट ६ इंच
पावलाच्या पंजाची रुंदी-५ फूट