आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपश्यना म्हणजे काय?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गृहत्याग केलेल्या राजकुमार सिद्धार्थद्वारा शोधल्या गेलेल्या व भारताच्या विलुप्त झालेल्या पुरातन विपश्यना साधनेच्या मार्गावर चालतच आचार्य सत्यनारायण गोयंका हे सम्यक संबुद्ध झाले. अर्थात त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. या मुक्तिदायिनी जीवन जगण्याच्या कलेला ‘विपश्यना’ साधनेला त्यांनी सीमित क्षेत्रातून बाहेर काढत या सार्वजनिक व विज्ञानसंमत प्रणालीच्या रूपाने स्थापित, विकसित करून प्रसारित केले.'

विपश्यना ही काही जादू नाही, की आमच्या डोक्यावर चढून ती बोलू लागेल. विपश्यना म्हणजे संमोहिनी विद्या नाही, की जिच्यामुळे दुसर्‍या कुणी आम्हाला संमोहित करून आमची शुद्धबुदही जावी. विपश्यना म्हणजे अंध भक्ती नाही, की अंध भावावेशही नाही, की ज्यामुळे भावोन्मादाने आपण उन्मुक्त होऊन राहू.
विपश्यना म्हणजे भजन, कीर्तन, संगीत किंवा नृत्य नाही, की ज्यामुळे धुंद होऊन आम्हाला स्वत:चा विसर पडेल. विपश्यना हा काही तत्त्वचिंतकांचा आखाडा नाही, की ज्या आखाड्यात आम्ही वादविवाद, तर्कवितर्क करीत शब्दांची खेचाखेच करून बौद्धिक खेळात आपले मन आम्ही भ्रमवू. जे जसे आहे, त्याला तसेच पाहून, समजून जे आचरण होईल तेच खरे, कल्याणकारी सम्यक आचरण होईल, विपश्यना हे पलायन नाही. जीवनाकडे पाठ फिरविणे नाही. उलट जीवनाला सामोरे जावून जगण्याची ती शैली आहे. मनाला येणारे नित्य मालिन्य हे मोहाने मूर्खपणाने आमचे आम्ही आणीत असतो. म्हणून आपणच प्रयत्नाने नेहमी जागरूक राहून नवे मालिन्य चढू न देणे ही विपश्यना. आपल्या मनावरचे जुने मालिन्य धुऊन टाकण्याचे कार्य विपश्यना करते. धीराने प्रयत्न करीत थोडे थोडे मालिन्य नाहीसे केले, तर एक दिवस मन पुरे निर्मळ झाल्यावर सद्गुणांनी भरून जाईल.

पुस्तके
० निर्मल धारा धर्म की
० प्रवचन सारांश
० जागे पावन प्रेरणा
० जागे अन्त बौद्ध
० धर्म : आदर्श जीवन का आधार
० तिपिटक में सम्यक संबुद्ध भाग 1 व 2
० धारण करे तो धर्म
० क्या बुद्ध दु:खवादी थे
० धम्मवाणी संग्रह
० सुत्तसार भाग 1, 2, 3
० धन्यबाबा
० आत्मकथन
० लोकगुरू बुद्ध
० मंगल जगे गृही जीवन में
० बाह्य सुरक्षा
० गणराज्य की सुरक्षा कैसे हो?
० अंगत्तर निकास

जीवनप्रवास
> 1924 : मंडाले (ब्रह्मदेश) येथे जन्म
> 1942 : विवाह
> 1955 : रंगूनमध्ये सयाजी ऊ बा खिन यांच्या विपश्यनेच्या ‘इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर’मध्ये दोन दिवसीय शिबिरात सहभाग.
> जून 1969 : विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान.
> जुलै 1969 : मुंबईत पहिले शिबिर 3 ते 14 जुलैपर्यंत एका धर्मशाळेत भरविले.
> 1976 : इगतपुरी येथे प्रमुख विपश्यना केंद्र ‘विपश्यना विश्व विद्यापीठ’ धम्मगिरीची स्थापना.
> 30 सप्टेंबर 2013 मुंबईत निधन.