आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizenship of sonia gandhi and aacharya balkrishna

नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

12 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य कोणताही मार्ग काँग्रेसपुढे शिल्लक नाही हे आता आणखीनच स्पष्ट झाले आहे.
काळ्या पैशावर चर्चा होत रहाणे काँग्रेसच्या सोयीचे नाही. त्यामुळे काँग्रेसने रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण, सुषमा स्वराज, आरएसएस यांच्यावर बेछूट आरोप करणे चालू ठेवले. त्यात चप्पल उगारल्याची घटनाही काँग्रेससाठी जणु वरदान ठरली. आणि याने उत्साहित झालेल्या दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्णन यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांचा उद्धार करणे सुरू केले. दरम्यान आचार्य बालकृष्ण प्रकट झाले आहेत. माझा जन्म भारतात झाला. माझे आई वडील नेपाळचे आहेत. परंतु माझे शिक्षण भारतात झाले आहे. मी भारतातच सेवा करतोय. मी मरेपर्यंत भारतातच राहीन, असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगीतले आहे. आता काँग्रेसने हे प्रकरण ताणले तर काँग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक दृष्टया आणि आध्यात्मिक दृष्टया भारत-नेपा एकच आहेत. देशांच्या सीमा ध्यानात घेऊन बोलायाचे तर आज नेपळमधे ४३ लाखाहून अधिक भारतीय आहेत आणि भारतात ७० लाखापेक्षा अधिक नेपाळी भारतीय नागरिक आहेत. तिबेट गिलंकृत केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून चीन नेपामध्ये भारतविरोधी विष कालवत आहे, अशा वेळी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी राजकारणी नेत्यांनी नेपाली नगरिकत्वाचा मुद्दा काढून नेपला भारतापासून दूर लोटण्याचे पाप केले आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरुद्ध मात्र गठ्ठा मतांसाठी हे राजकारणी जनतेची दिशाभूल करीत असतात हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सर्वेसर्वा यांच्या नागरिकत्वासंबंधीची तथ्ये अधिक गंभीर आहेत. नागरिकत्वाच्या मुद्दयावर आचार्य बालकृष्ण यांची बाजू सोनिया गांधी यांच्यापेक्षा उजवी आहे. कारण इंग्रजांमुळे नेपाळ प्रांताला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळालेला असला तरी नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या भारताला अतिशय जवळचा आहे. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान असताना १९५३ साली नेपाळने भारतात विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. भारतातून नेपाळात आणि नेपाळातून भारतात यायला जायला पारपत्र लागत नाही ते यामुळेच. पशुपतीनाथासारखी तीर्थक्षेत्रे भारतीयांसाठी श्रद्धेय आहेत. इतकेच नाही तर पशुपतीनाथाचे पुजारी हे परंपरेने भारतीय आहेत. अशी सांस्कृतिक नाळ असल्यामुळे बालकृष्ण नेपाळी वंशाचे असल्याचा मुद्दा तसा भारतीयांच्या दृष्टीने गौण आहे. घटनेतल्या तरतुदीनुसारही आचार्य बालकृष्ण हे भारताचे नागरिक ठरतात. परंतु सोनिया गांधी यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे काय.
इटलीचे राजदूत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्रातून 27 एप्रिल 1983 रोजी लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी केलेली फसवणूक उघड केली आहे. अ‍ँटोनिया नाव बेमालूमपणे बदलून सोनिया नाव कसे लावले गेले ते या पत्रातून उघडे पडले आहे. पाहा... http://www.janataparty.org/annexures/ann05p32.html
सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती खोटी ठरली आहेत. त्यांनी शिक्षणाबद्दलची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. अर्थातच या गोष्टींची भरपूर चर्चा झाली आहे. याचे ठोस पुरावेही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. स्वीस बँकेशी आणि रशियन गुप्तचर संस्थेशी असलेले संबंध, पोप आणि व्हॅटिकनशी असलेले सोनियांचे संबंध आणि त्यांचा नागरिकत्वाचा मुद्दा या साऱ्याच गोष्टी काँग्रेसला अडचणीच्या ठरू शकतात. परंतु काँग्रेसला अडचणीच्या ठरतील अशा मुद्दयांवर खुबीने बगल देण्याची कला अवगत आहे. त्यामुळे या मुद्दयावर काँग्रेस कायम मूग गिळून असते. आता दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काढला आहे की जो काँग्रेसने अधिक ताणला तर काँग्रेसच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेला येणे, ही गोष्ट काँग्रेसला फायद्याची नाही. त्यामुळे आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काँग्रेस अधिक ताणणार नाही. त्याऐवजी रामदेव बाबा यांच्यामागे अनेक तपासण्यांचा ससेमिरा लावून हैराण करेल याची शक्यता अधिक आहे.आपले मत
तुम्हाला काय वाटतं ? आचार्य बालकृष्ण यांच्याबद्दल दिग्विजयसिंग यांनी काढलेली विधाने तुम्हाला योग्य वाटतात का ? असे करून सोनिया गांधी यांच्या नागरिकत्त्वाची चर्चा करण्याची आयती संधी दिग्विजय सिंग यांनी विरोधकांना दिली, असे तुम्हाला वाटते का ? या मुद्दयावर तुमची मते अवश्य लिहा... पुढील चौकटीमध्ये ...स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी