आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारे : आत्महत्येचे विचार ते जनलोकपाल - एक प्रवास

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्ण नाव : किसन बाबूराव हजारे
अण्णा हजारे या टोपण नावाने प्रसिद्ध
जन्म : १५ जून १९३७
जन्मस्थळ : तत्कालीन मुंबई प्रांतातील हिंगणघाटजवळील भाईंगर या छोट्या खेड्यात
पूर्वायुष्य : वडील बाबूराव हजारे हे आयुर्वेद आश्रम फार्मसीमध्ये अकुशल कामगार होते. १९५२ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि आपले मूळगाव राळेगणसिद्धीला परतले. अण्णांना यांना सहा लहान बहीण भाऊ होते. गावी कुटुंब कशीबशी गुजराण करत होते. अण्णांच्या अपत्यहीन मावशीने त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणले. मुंवईत अण्णांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी मुंवईतील दादरला फुले विकण्यास सुरुवात केली. व्यवसायात जम बसल्यामुळे त्यांनी स्वत:चे दुकान थाटले आणि दोन भावांना मुंबईत आणले.
सैन्यातील सेवा
१९६२ मध्ये शारीरिक क्षमता चाचणीत बसत नसतानाही २५ वर्षीय अण्णांची सैन्यात निवड झाली. औरंगाबादेत सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर १९६३ पासून सैन्यात वाहनचालक म्हणून अण्णांनी कारकीर्दीला सुरुवात केली. १९६५ च्या भारत - पाक युद्धात अण्णा खेमकरन सीमेवर तैनात होते. १२ नोव्हेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने भारतीय तळावर हवाई हल्ले सुरू केले. त्यात अण्णांचे सर्व सहकारी मारले गेले. सैन्याला रसद पुरविणारा ट्रक चालविणाºया अण्णांच्या कपाळाला एक गोळी चाटून गेली, पण फलटणीतील केवळ अण्णा बचावले. या घटनेने त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्तीवेतनासाठी पात्र होताच त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली .
राळेगणमधील सुरुवात
राळेगणसिद्धी हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील कायम दुष्काळाला तोंड द्यावे लागणारे गाव. १९७५ मध्ये राळेगणसिद्धीला परतल्यानंतर संत यादवबाबा मंदिराच्या एका छोट्या खोलीत राहून अण्णांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. गावातच असलेल्या आपल्या घरी अण्णा तेव्हापासून कधीही गेले नाहीत.
दारूबंदीसाठी एकजूट
अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले. तरुण मंडळाची स्थापना केली. संत यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली. मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले. व्यसनाधी राळेगण व्यसनमुक्त झाले.
अन्नधान्य बँक
गरजू गावक-यांच्या मदतीसाठी १९८० मध्ये अण्णांनी यादवबाबा मंदिरातच अन्नधान्य बँक सुरू केली. श्रीमंत शेतकºयांनी दान केलेले धान्य ते गरजूंना द्यायचे.
श्रमदानातून जलसंधारण
राळेगणसिद्धीला सुजलाम् करण्यासाठी अण्णांच्या पुढाकारातून गावकºयांनी श्रमदान केले व छोटी तळी आणि पाझर तलाव बांधले. तीन लाखांहून अधिक झाडे लावली. त्यामुळे पाणीटंचाई संपली. १९७५ मध्ये केवळ ७० एकर जमीन कशीबशी सिंचनाखाली होती. अण्णांच्या प्रयत्नातून २५०० एकर जमीन भिजू लागली. हे प्रयोग पुढे महाराष्ट्रभर राबविण्यात आले.
ग्रामसभा
गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला देण्याच्या मागणीसाठी १९९८ ते २००६ या काळात अण्णांनी राज्यभर जनजागृती मोहीम राबविली. सरकारला ग्राम सभा कायद्यात सुधारणा कराव्या लागल्या.
माहितीचा अधिकार
सन २००० मध्ये माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी अण्णांनी राज्यभर लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे २००३ मध्ये महाराष्ट्र सरकारला माहिती अधिकाराचा कायदा करावा लागला.
१९७९ - गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी नगर जिल्हा परिषदेसमोर उपोषण - शाळेला मान्यता मिळाली. नापासांची शाळा म्हणून ही शाळा मान्यता पावली.
१९८३ - गावात वीस कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संत यादवबाबा मंदिरात उपोषण. ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.
१९८९ - ठिबक सिंचन अनुदान धोरणातील त्रुटी दूर करण्यासाठी उपोषण. सरकार पातळीवर तातडीने दखल घेत ठिबक सिंचनाच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले.
१९८९ - वीजप्रश्नी नऊ दिवस उपोषण, त्यानंतर शेतक-यांचा रास्ता रोको, गोळीबार व त्यामध्ये चार शेतक-यांना हौतात्म्य. नगर जिल्ह्यातील तीन वीज उपकेंद्रांसाठी चार कोटी, तर राज्यातील ठिकठिकाणच्या वीज उपकेंद्रांसाठी ६५ कोटींचा निधी सरकारकडून मंजूर.
१९९० - सरकारकडे सादर केलेल्या वनीकरण व इतर खात्यांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ४४ दिवसांचे मौन आंदोलन व इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार केंद्र सरकारला परत पाठविला.
१९९१ - पद्मश्री पुरस्कार केंद्राला परत करून भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीसाठी आमरण उपोषणाचा इशारा. दोषी ११ उच्चपदस्थ अधिकाºयांसह इतरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू.
१९९४ - उर्वरित अधिका-यांविरुद्ध कारवाईसाठी आळंदीत उपोषण. अधिका-यांवर तातडीने कारवाई.
१९९६ - भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या ४१२ प्रकरणांबाबत कारवाईसाठी अन्नत्याग व सत्याग्रह. भ्रष्टाचारप्रकरणी शशिकांत सुतार व महादेव शिवणकर या मंत्र्यांचे राजीनामे.
१९९८ - तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा. येरवडा तुरुंगातही हजारे यांचे उपोषण. जनतेची राळेगणसिद्धी ते येरवडा पायी दिंडी. सरकारने हस्तक्षेप करीत हजारे यांची तुरुंगातून सुटका केली.
१९९९ - भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची स्थापना. भ्रष्ट अधिका-यांवरील कारवाईसाठी आळंदीत उपोषण व साने गुरुजींच्या मार्गाने जाण्याचा निर्धार. जनतेच्या व ग. प्र. प्रधान यांच्या आग्रहाखातर उपोषण सोडले. सरकारची नाचक्की.
२००१ - माहिती अधिकार विधेयकातील दुरुत्या होण्यासाठी मौनव्रत.
२००३ - काँग्रेस सरकारच्या काळातील ७३७ प्रकरणांच्या चौकशीसाठी मौन. आर. आर. पाटील व शिवाजीराव मोघे या दोन मंत्र्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन ग्रामसभेत अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करीत असल्याची घोषणा केली.
२००३- सुरेश जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार मंत्र्यांविरुद्ध कारवाईसाठी मुंबईत आझाद मैदानात उपोषण. न्या. सावंत आयोगाची मंत्री व हजारे यांच्या चौकशीसाठी नियुक्ती.
२००३ - माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आझाद मैदानात उपोषण. माहिती अधिकार कायदा २००२ पूर्वलक्षी प्रभावाने लागू.
२००३- मुद्रांक घोटाळ्याच्या नि:पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका. दहा पोलिस अधिका-यांना अटक.
२००४ - माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मौन व उपोषण.
२००६ - माहिती अधिकार कायद्यातील सरकारला जाचक असलेल्या बाबी वगळण्याच्या केंद्राच्या हालचालींविरुद्ध उपोषण. केंद्र्र सरकारकडून प्रस्तावित बदल रद्द.
२०१० - पतसंस्थांमधील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी सरकारने तब्बल तीन वर्षे प्रतिसाद न दिल्याने उपोषण. पतसंस्थांमधील एक हजार कोटींचा गैरव्यवहार उघडकीस. ठेवीदारांच्या ठेवींसाठी राज्य सरकारकडून २०० कोटींचा निधी तयार.
२०१० - टोल वसुलीबाबत आंदोलनाचा इशारा. राज्यातील ३३ टोल नाके बंद.
२०१० - लवासा प्रकल्प अवैध असल्याचा आरोप करीत उपोषणाचा इशारा. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चौकशी करून १८ जानेवारी २०११ रोजी लवासा प्रकल्प अनधिकृत ठरविला.
२०११- जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ५ एप्रिलपासून जंतरमंतरवर बेमुदत उपोषण. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ९ एप्रिल रोजी उपोषण सोडले. नागरी समितीला सरकारी लोकपालचा मसुदा मान्य नसल्यामुळे जनलोकपाल बिलाच्या मसुद्यासाठी १६ ऑगस्ट रोजी जेपी पार्कवर बेमुदत उपोषण सुरू करण्यापूर्वीच अण्णांना मयूरविहारमधून अटक करण्यात आली. वीस वर्षांच्या लढ्यात अण्णांनी दीडशेहून अधिक दिवस मौन, १०८ दिवस उपोषण केले.
पुरस्कार
२००८ - जागतिक बँकेचा जित गिल स्मृती पुरस्कार
२००५ - गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
२००३ -जर्मनीचा राष्ट्रीय पारदर्शकता एकात्मता पुरस्कार
२००० - सेंट पॉल मित्तल राष्ट्रीय पुरस्कार
१९९८- रोटरी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार
१९९८- केअर इंटरनॅशनल अवॉर्ड
१९९७ - महावीर पुरस्कार
१९९६- शिरोमणी पुरस्कार
१९९४- विवेकानंद सेवा पुरस्कार
१९९२- पद्मभूषण
१९९० - पद्मश्री (सरकारला परत केला)
१९८९ - महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार
१९८६ - प्रियदर्शिनी इंदिरा वृक्षमित्र पुरस्कार
१९८८ - मॅन ऑफ द इयर
आत्महत्येचा विचार
जगण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धावपळ, राग, लोभ, द्वेष एकमेकांची फसवणूक हे सारेच पाहून अण्णा अस्वस्थ व्हायचे. आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात यायचा. अशाच उद्विग्न मन:स्थितीत असताना दिल्ली रेल्वेस्थानकावर स्वामी विवेकानंदाचे मुखपृष्ठ असलेले एक पुस्तक त्यांनी खरेदी केले आणि ते वाचून त्यांना जीवनाचा अर्थ उमगला. स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी जगण्याचे अपरिमित सुख त्यांनी अनुभवायचे ठरविले.
तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता