आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला खेळाडूंच्या लिंग तपासणीचे त्रांगडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंग तपासणीबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) प्रस्तावित धोरणाचा लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला क्रीडापटूंना त्रास होऊ शकतो. ज्यांच्या लिंगाबाबत वाद निर्माण झाला असेल अशा महिला क्रीडापटूंच्या शरीरातील टेस्टोस्टिरोनचे प्रमाण तपासण्याचा प्रस्ताव आहे. केस्टर सेमेन्याच्या लिंगाबाबत 2009 मध्ये वाद निर्माण झाला. तिची थेट लिंग तपासणी करण्यात आली. हा प्रकार नकोसा व खासगी आयुष्यावर हल्ला असल्याचे तिने सांगितले.
नवीन धोरण भेदभाव करणारे आहे. जीवशास्त्राच्या निकषांवर ते अचूक ठरणारे नाही. बायोअ‍ॅथेसिस्ट रेबेका जॉर्डन यंगनुसार या धोरणात फक्त महिलांच्या टेस्टोस्टिरोन तपासणीची तरतूद आहे, पुरुषांच्या नाही. टेस्टोेस्टिरोनचे प्रमाण अधिक असल्यास महिला किंवा पुरुष खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम खेळ करता येत नाहीत. स्पेनची महिला क्रीडापटू मारिया जोस मार्टिनेजच्या नुसार महिला क्रीडापटूच्या लिंग तपासणीचे परिणाम भयावह होऊ शकतात. 1986 मध्ये मारिया नामक क्रीडापटूच्या तपासणीनंतर तिच्या गुणसूत्रात दोष असल्याचे स्पष्ट झाले. तिचे लग्न मोडले. शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे लिंग परीक्षण न करणे हाच योग्य मार्ग आहे.
आयओसीचे लिंग
परीक्षण : अपयशी वाटचाल
‘परेड’चे अपयश - महिलांचे लिंग व अन्य शारीरिक लक्षणे तपासण्यासाठी 1960 च्या दशकात आयओसी डॉक्टरांच्या समोर महिला क्रीडापटूंची नग्नावस्थेत परेड केली जात असे, परंतु काही क्रीडापटूंमध्ये महिला व पुरुष दोघांची लिंगे व लक्षणे आढळल्याने ही पद्धत निरुपयोगी ठरली.
गुणसूत्रे - 1967 पासून आयओसीने लिंग तपासणीसाठी गुणसूत्रांचे परीक्षण सुरू केले. पुरुषांमध्ये एक्स-वाय व महिलांमध्ये एक्स-एक्स गुणसूत्रे असतात. मात्र, या परीक्षणातही काही नैसर्गिक कारणांमुळे अडचणी आल्या. काही पुरुषांमध्ये एक एक्स गुणसूत्र अधिक, तर काही महिलांमध्ये एक गुणसूत्र कमी आढळले.
हार्मोन्स - आयओसी आता टेस्टोस्टिरोनच्या प्रमाणाची तपासणीच्या विचारात आहे. साधारणत: महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. माणसागणिक हे प्रमाण वेगळे असते. दिवसाभरातील वेळ व संबंधित व्यक्तीच्या सक्रियतेवरही हे प्रमाण आधारलेले असते.