आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या पंतप्रधानांचा अचानक नेपाळ दौरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू: चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ आज अचानक नेपाळ दौर्‍यावर रवाना झाले. वेन आणि नेपाळचे पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांच्यात गुंतवणुकीसह विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या दौर्‍यासाठी काठमांडूत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. उभय देशांमध्ये एकूण आठ करार झाले. मात्र, या चर्चेवेळी मीडियाला आसपासही फिरकू देण्यात आले नाही.
भट्टाराय यांच्या भेटीनंतर त्यांनी राष्ट्रपती रामबरन यादव, माओवादी नेते प्रचंड, नेपाळ काँग्रेसप्रमुख सुशील कोईराला यांचीही भेट घेतली या दौर्‍यात ते चीन-नेपाळ यांच्यातील आठ समझोत्यांवर स्वाक्षरी करणार आहेत. दोन्ही देशांत 500 दशलक्ष डॉलर्सचा करार करण्यात आला. याशिवाय पायाभूत सुविधा आणि संरक्षणासाठी चीनने 135 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.
उभय नेत्यांची बैठक ज्या पंतप्रधान निवासस्थानात झाली. त्या परिसरात केवळ काही छायाचित्रकार, मोजकाच इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना प्रवेश देण्यात आला होता. वेन यांचे शुक्रवारी पावणेबाराच्या सुमारास येथे आगमन झाले. वेन यांच्या आगमनाच्या एक तास अगोदर विमानतळावर चार जणांना अटक करण्यात आली यापैकी दोन चिनी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिला तिबेटी असल्याचा संशय आहे. त्या राजवाड्यातील नारायणहिती संग्रहालयात धार्मिक पोशाखात फिरत असताना आढळून आल्या होत्या. दुसरीकडे वेन यांच्या नेपाळ भेटीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी काठमांडूत 154 तिबेटी नागरिकांना अटक करण्यात आली होती.