आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Will Attack This Year In June, July, International

जून-जुलैमध्ये चीन करणार भारतावर हल्ला?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीन यावर्षी जून किंवा जुलै महिन्यात भारतावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्कराच्या माजी अधिकारयांनी याबाबत शंका व्यक्त केली असून हिमालयातील बर्फ विरघळला की ड्रॅगन आपला रंग दाखवेल. माजी लष्कर अधिकारी कर्नल अनिल आठल्ये यांच्या माहितीनुसार, चीन संपूर्ण युद्धाऐवजी अचानकपणे छोटा पण कडक हल्ला करेल.
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत की, चीन भारतावर दोन पद्धतीने हल्ला करु शकते. एक म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील ताब्यात असलेल्या तिबेट भागातून हल्ला करु शकते. तर दुसरीकडे लेह लडाखजवळच्या गिलगिटकडूनही चीन भारतावर हल्ला करु शकतो. या सर्व घटनाक्रमांत पाकिस्तान चीनला साथ देऊ शकतो.
चीनकडून भारताला धोका असताना भारतीय लष्करात अंतर्गत हेव्या-दाव्यांनी रंग भरला आहे. लष्करप्रमुख विजय कुमार सिंह यांच्या जन्मतारखेच्या वादावरुन चाललेला प्रकार बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचे आठल्ये यांनी म्हटले आहे. त्यामुळे लष्कराचे मनोबल खचू शकते. १९६२ च्या युद्धाच्या काही काळ आधी तत्कालीन लष्करप्रमुख व संरक्षणमंत्री यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा राजीनामा मागे घेत तो फेटाळून लावला होता. आठल्ये यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचा १९६२ च्या युद्धात त्याचा विपरित परिणाम लष्कारावर झाला. पराभवाचे ते एक कारण आहे.
चीनने मागील काही काळापासून भारताविरुद्ध उचलेल्या पावलामुळे भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
अधिका-याला व्‍हीसा नाकारल्‍यानंतरही सैन्‍य प्रतिनिधींचा चीन दौरा होणार
वायुसेना अधिका-याला व्‍हीसा नाकारल्‍यानंतर सैन्‍य प्रतिनिधी मंडळाचा चीन दौरा रद्द
पाक लष्करप्रमुख कियानी चीन दौ-यावर