आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळावर आढळला लाव्हाचा प्रवाह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मंगळाच्या भूमध्यरेषेजवळ दोरीच्या वेटोळ्याच्या आकाराचे लाव्हा रसाचे नवीन प्रवाह आढळून आले असल्याचा दावा अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
अँड्र्यू रेयॉन यांनी ‘सायन्स’ शोधपत्रिकेत लिहिलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, गोगलगायसदृश लाव्हा रसाचे प्रवाह पृथ्वीच्या काही भागात आढळून येतात, मात्र मंगळावर ते यापूर्वी कधीही आढळून आले नाहीत. मंगळग्रहावरील बहिर्वाह प्रवाहाबाबत मला खूपच रस होता. अथाबस्का वेल्स आणि सेर्बरस पलूसने तर मला मोहिनी घातली होती. अथाबस्का वेल्सला मोठा मनोरंजक इतिहास असल्याचेही रेयॉनने म्हटले आहे. यापूर्वी संशोधकांनी मंगळाच्या भूमध्यरेषेखालील थररचनेत गोठलेल्या पाण्याचा प्रवाह असल्याचे म्हटले होते.
मंगळ सफरीसाठी आता तुम्हीच सुचवा आयडिया
मंगळ ग्रहावरच्या दगडांना सोन्यापेक्षाही जास्त भाव