आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना भेटलाय आयएसआय एजंट फई !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - काश्मिरी फुटीर नेता आणि आयएसआय एजंट गुलाम नबी फई याने दावा केला आहे की, तो गेल्या दोन दशकात भारताच्या कॅबिनेट मंत्र्यांना नियमितपणे भेटायचा. तसेच त्याचे अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी नियमित संपर्क होते. अमेरिकेच्या न्यायालयात फई याने आयएसआय एजंट असल्याचे मान्य केले आहे. भारतीय अधिका-यांना नियमित भेटणे आपल्या रणनीतीचाच भाग होता असे फई याने म्हटले आहे.
फई याने दावा केला आहे की, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारातील अनेक कॅबिनेट मंत्र्यांना तो भेटला आहे. या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे सांगण्यास मात्र त्याने नकार दिला आहे.
६२ वर्षीय गुलाम नबी फई याने गेल्याच आठवड्यात आयएसआयचा एजंट असल्याचा गुन्हा मान्य केला आहे. 'गेल्या २० वर्षांत मी यूएनच्या सरचिटणीसांचे माजी वरिष्ठ सल्लागार युसुफ बक आणि वर्ल्ड काश्मीर फ्रीडम मुव्हमेंटचे अयुब ठुकर यांच्यासोबत भारताच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना भेटलो आहे, असे फई याने म्हटले आहे.
गुलाम नबी फई साधत होता सांकेतिक भाषेतून आयएसआयशी संपर्क
विचार भारताचा : फई प्रकरण - 'युजफुल इडीयटस'वर कारवाई करणार काय ?