आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमा प्रश्नांवरुन भारत-चीन आज आमने-सामने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद सोडविण्यासाठी आज नवी दिल्लीत पुन्हा एकदा बैठक होत आहे. या बैठकीच्या आधी माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार चीन भारताबरोबर संबंध सुधारु पाहत आहे. तसेच एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे संकेत देत आहे. सीमा वाद मिटविण्यासाठी बैठकीची ही १५ वी फेरी आहे. या बैठकीत दोन्ही देशातील पंतप्रधान यांचे खास प्रतिनिधी भाग घेतील.
ही बैठक आज आणि उद्या चालेल. भारतातील चीनचे राजदूत चांग यान यांनी म्हटले आहे की, हे वर्ष दोन्ही देशांसाठी खुषखबरीचे असेल. ते म्हणाले, हे वर्ष दोन्ही देशांतील नागरिकांच्या दृष्टीने चांगले राहील. तसेच दोन्ही देशाचे नाते आणखी घट्ट होईल.
ही बैठक नोव्हेंबर ११ मध्ये होणार होती. पण दिल्लीत आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय बौद्ध सम्मेलनात दलाई लामा यांनी सहभाग घेतला होता. तसेच चीनने यावर आक्षेप घेत भारताने दलाई लामा यांचा कार्यक्रम रोखावा, असे सांगितले होते. मात्र भारताने चीनची ही विनंती फेटाळून लावली होती. त्यामुळे चीनचे स्टेट कौन्सिलर ताई पिंग क्वो यांनी बैठकीसाठीचा भारत दौरा रद्द केला होता. त्यानंतर महिनाभर दोन्ही देशांच्या आदान-प्रदानामध्ये खंड पडला होता. आता नव्या वर्षात पुन्हा एकदा दोन्ही देशादरम्यान चर्चेला सुरवात होत आहे.
चीनच्या पंतप्रधानांचा अचानक नेपाळ दौरा