आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Richest Persons Number Increase In Last Year

महागाई असूनही भारतात कोट्यधीशांची संख्या वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - युरोपातील आर्थिक संकट व देशातील वाढत्या महागाईचा देशातील श्रीमंतांच्या संपत्तीवर फारसा फरक पडलेला नाही. 2011 मध्ये जगभरातील 1 लाख 75 हजार लोक कोट्यधीशांच्या क्लबमध्ये सहभागी होण्यात यशस्वी ठरले असून त्यात बहुतांश श्रीमंत हे भारत व चीनमधील आहेत.
बोस्टन कन्सल्टींग ग्रुप (बीसीजी) च्या ‘ग्लोबल वेल्थ रिपोर्ट’मध्ये ही माहिती पुढे आली आहे. या अहवालानुसार भारतात कोट्यधीशांच्या संख्येत (ज्यांची संपत्ती एक दशलक्ष डॉलर किंवा 5.5 कोटी रुपये आहे) 28 हजारांनी वाढ झाली आहे. 2010 मध्ये ही संख्या 1 लाख 34 हजार होती. भारतात 100 दशलक्ष डॉलर (सरासरी 550 कोटी रुपये) संपत्ती असणा-या लोकांची संख्याही 241 वरुन वाढून 278 पर्यंत गेली आहे.
त्याचवेळी जगातील कोट्याधीश कुटुंबांची संख्या वाढून 1 कोटी 26 लाखांवर गेली आहे. त्यात सर्वाधिक 51 लाख कोट्यधीश अमेरिकन आहेत. या संख्येत 1 लाख 29 हजारांनी घट झाली आहे. 16 लाख कुटुंबीयांसह जपान दुस-या तर 14 लाख कोट्यधीशांसह चीन तिस-या स्थानी आहे.
अमेरिका टॉपर : बीसीजीच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक कोट्यधीश कुटुंब (100 दशलक्ष डॉलर संपत्ती) हे अमेरिकन आहेत. त्यांची संख्या 2 हजार 928 आहे. यानंतर ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन या देशांचा क्रमांक लागतो.
भारतातील संख्या आणखी वाढणार
पुढील 4 वर्षांत भारतात खासगी संपत्तीमध्ये एकूण 19 % वार्षिक वाढ होईल. ही वाढ 4 -5 टक्केच्या जागतिक विकास दरापेक्षा अधिक आहे. स्टॉकब्रोकिंग फर्म कार्वीच्या म्हणण्यानुसार भारतातील संख्या 7300000 कोटी आहे. जगात खासगी आर्थिक संपत्ती 2011 मध्ये 122 ट्रिलियन डॉलर इतकी असून 2016 पर्यंत ती 150 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक वाढीचा दर 10 % भारतीय श्रीमंतांच्या खात्यात जमा होईल.