आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडानकुलम काम दोन आठवड्यांत सुरू होणार- पंतप्रधानांची राशियात घोषणा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - वादात सापडलेल्या कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे काम येत्या दोन आठवड्यांत सुरु होईल, अशी घोषणा भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. त्यामुळे प्रकल्पासंबंधीची अनिश्चितता आता संपली. या प्रकल्पाच्या पहिल्या युनिटसाठी रशियाने सहकार्य करण्यासाठी तयारी दाखवली असली तरी तिसºया व चौथ्या युनिटसाठी रशियाने करारावर स्वाक्षरी केली नाही.
मेदवेदेव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सिंग संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. दुसºया युनिटचे काम पहिले सुरू झाल्यानंतर सहा महिन्याने सुरू होईल. तिसºया व चौथ्या युनिटसाठी स्वाक्षरी न करण्याचा निर्णय हा उभय देशांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तामिळनाडूतील या प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणावरून स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करत मोठे आंदोलन छेडले आहे, परंतु सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांनी काहीही चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी या वेळी दिली.
आण्विक पाणबुडी: अण्वस्त्रांनी सज्ज असलेली ‘नेरपा’ ही आण्विक पाणबुडी रशियाकडून भारताला मिळणार आहे. 10 वर्षांच्या करारावर ही पाणबुडी दिली जाणार असून या महिन्याच्या अखेरीस ती विशाखापट्टणम येथील नौदल तळावर दाखल होणार आहे.
रशियाचा भारताला पाठिंबा
मॉस्को- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करताना भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याच्या मागणीस रशियाने शुक्रवारी आपला पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान मनमोहन सिंग व राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्या उपस्थितीत 12 वी राष्ट्रीय परिषद येथे पार पडली. त्या वेळी हे जाहीर करण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या व्हेटो अधिकार असलेल्या पाच सदस्यांत रशियाचा समावेश आहे. तत्पूर्वी क्रेमलिन येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियोजित एक तासाची ही बैठक दोन तास चालली.