आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळावर पाण्याचे अस्तित्व असणे म्हणजे सजीव असणारच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2001 मध्ये नासाने मार्स ओडेसी हे यान प्रक्षेपित केले. यातील गॅमॅ रे स्पेक्ट्रोमीटरने मंगळावरील एक मीटर उंचीच्या थरात मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याचे संकेत दिले आहेत, तर 2004 मघ्ये प्लॅनेटरी फुरिए स्पेक्ट्रॉमिटर गटाने मंगळाच्या वातावरणात मिथेन सापडल्याचे घोषित केले होते. तसेच 2006 मध्ये नासाने मंगळावर अरोरा (ध्रुवीय प्रकाश) आढळून आल्याचे सांगितले होते.
स्पिरिट व अ‍ॅपॉर्च्युनिटी हे दोन जुळे रोव्हर नासाने प्रक्षेपित केले होते व ही दोन्ही याने सन 2004 साली नियोजित स्थळी सुखरूप उतरली.
या दोन यानांनी अत्यंत महत्त्वाची माहिती पाठविली ती अशी की, ते ज्या स्थानी उतरले होते तिथे पूर्वी पाणी होते याचा महत्त्वपूर्ण पुरावा. तसेच मंगळावरील धूळ पिशाश्च (डस्ट डेव्हिल्स- म्हणजे अधिक काळ टिकणारे धुळीचे वादळ) आणि वावटळीमुळे यानांची सौर तावदाने स्वच्छ झाली आहेत व त्यामुळे त्यांचे आयुष्यही वाढले आहे. पाण्याचे अस्तित्व असणे म्हणजे सजीवाची शक्यता असणे, त्यादृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.