आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळावर पृथ्वीइतकेच पाणी;शास्त्रज्ञांनी केला दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मंगळ ग्रहावर पृथ्वीइतकाच पाणीसाठा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंदर्भात ठोस पुरावे हाती लागल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मंगळावर पाणीसाठा असण्यासोबत पृथ्वीच्या भूगर्भात आढळणारा ओलसरपणा त्यामध्ये दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.
मंगळ ग्रहाबाबतचे नवे निष्कर्ष जिऑलॉजी जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. नव्या संशोधनामुळे मंगळावर अल्प प्रमाणात पाणी असल्याचा दावा खोडून निघाला आहे. अनेक वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी प्रवाह वाहिला होता, असे याआधी सांगण्यात आले होते. नव्या संशोधनात मुबलक पाणी साठ्याच्या दाव्यामुळे आधीचे निष्कर्ष मागे पडले आहेत. याआधी मंगळ ग्रहाच्या कोरडेपणाबाबतचे गृहितक का मानले गेले, याबद्दल कार्निग इन्स्ट्यिूट ऑफ वॉशिंग्टनमधील अभ्यासक इरिक हौरी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नासाच्या स्पिरिट आणि रोव्हर या स्वयंचलित मोटार वाहनाच्या 2004 मधील मोहिमेमध्ये मंगळ ग्रह सध्या जेवढ्या प्रमाणात उष्ण आहे, त्या तुलनेत याआधी तो अधिक प्रमाणात होता, असे या संशोधनात स्पष्ट करण्यात आले होते. मंगळावरील रोबोच्या अभ्यासात पाणी आणि ऊर्जा स्त्रोत आढळून आले होते. नव्या संशोधनामुळे मंगळ ग्रहाचा इतिहास आणि उत्पत्तीविषयीचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे. या अभ्यासातून मंगळ ग्रहामध्ये पाणी साठा कसा निर्माण झाला याचा केवळ खुलासा होत नाही तर अशा ग्रहांमध्ये समावलेल्या हायड्रोजन वायूच्या तंत्राची उकलही होऊ शकते.
दोन उल्कापिंडांतून अभ्यास - ज्वालामुखीद्वारे मंगळाच्या पृष्ठभागावर सुरुवातीस पाणी आले असावे, असे हौरी यांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरील दोन उल्कापिंडांचा अभ्यास केला. हे उल्कापिंड 2.5 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळले होते. सेकंडरी आयन मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या अभ्यासात उल्कापिंडाच्या आवरणात 70 ते 300 प्रति दशलक्ष भागात (पीपीएम) पाणी आढळून आले. पृथ्वीचे हे प्रमाण 50 ते 300 पीपीएम आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मंगळ ग्रह अस्तित्वात आल्यापासून त्यामध्ये पाणी होते. त्याचप्रमाणे ग्रहांच्या विभाजन प्रक्रियेदरम्यानही मंगळ ग्रहामध्ये पाणी साठवून घेण्याची क्षमता होती, असे हौरी यांनी म्हटले आहे.