आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात 19 बॉम्बस्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एटीएम मशीन आणि रेल्वे रुळांना लक्ष्य करून 19 बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यात दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले. सिंध प्रांताची राजधानी कराचीसह वेगवेगळ्या शहरांमध्ये पहाटे कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची माहिती स्थानिक सुरक्षा यंत्रणेने दिली.

हैदराबाद शहरातील नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान आणि सिंध बँकेच्या एटीएम केंद्रांमध्ये पाच बॉम्बस्फोट घडवले. कोत्री या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन वाहनांचे नुकसान झाले. तर जमशोरो येथील नॅशनल बँकेजवळच्या एका दुनाकाचे नुकसान झाले. एकट्या नॅशनल बँकेच्याच अकरा शाखांवर हे बॉम्बहल्ले झाल्याचे बँकेचे प्रादेशिक प्रमुख लतीफ अन्सारी यांनी सांगितले. घोटकी येथे रेल्वे रुळावर झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटामुळे पंजाबहून सिंघला जाणार्‍या जफर एक्स्प्रेसला अपघात होता होता टळला. स्फोटानंतर गावकर्‍यांनी रेल्वेला अडवून संभाव्य दुर्घटनेपासून बचावले. नवख्या सिंधू देश लिबरेशन आर्मी या संघटनेने या स्फोट मालिकेची जबाबदारी स्वीकारली आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी या संघटनेची पत्रके सापडल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक ऐजाझ भट्टी यांनी दिली. यापूर्वीही या संघटनेने रेल्वेरुळांवर बॉम्बस्फोट घडवलेले आहेत. या साखळी बॉम्बस्फोटानंतर बँक, एटीएम आणि रेल्वे रुळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.