आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तान सरकार व लष्कर, आयएसआय यांच्यात मागील काही काळापासून सुरु असलेला वाद अजूनही संपुष्टात आल्याचे दिसून येत नाही. कारण बुधवारी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव नईम खालीद लोधी यांची पदावरुन हकालपट्टी केली. वादग्रस्त विधाने केल्याबद्दल लोधी यांची हकालपट्टी केली असल्याचे बोलले जात आहे.
लादेनला अमेरिकन कमांडोनी ठार मारल्यानंतर झरदारी यांना लष्कर सत्ता ताब्यात घेईल, अशी भीती होती. त्यामुळे झरदारी यांनी एक अमेरिकेला नोट लिहली होती. नंतर हे प्रकरण मेमोगेट म्हणून खूप गाजले. त्याचवेळी लष्करप्रमुख कयानी व आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांच्यात व सराकरमध्ये मोठा दरार निर्माण झाला होता.
लोधी यांनी न्यायालयात सांगितले होते की, सरकारचे लष्कर व आयएसआयवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही.
लष्करप्रमुख कयानी काल रात्रीच चीनच्या दौरयावरुन परतले असून, बुधवारी त्यांनी म्यानमारच्या हवाईदल प्रमुखांबरोबर चर्चा केली.
कयानी, पाशा यांची गच्छंती? पाकिस्तान सरकारकडून गंभीरपणे विचार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.