आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak, Corruption, Revenue , Police More Corrupted

पाकिस्तानात न्यायपालिका, महसूल व पोलिस विभाग सर्वात भ्रष्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- पाकिस्तानमध्ये न्यायपालिका आणि पोलिस यत्रंणा सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे नुकत्याच झालेल्या पाहणीत म्हटले आहे. एका आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार तपास संस्थेने देशातील सर्वात भ्रष्ट संस्थाना यात सामील केले आहे. ट्रान्सफरन्शी इंटरनॅशनल पाकिस्तानच्या राष्ट्रीय भ्रष्टाचार २०११च्या पाहणीत महसूल विभाग व पोलिस विभाग सगळ्यात जास्त भ्रष्ट आहे. तर, शिक्षण आणि सेनेत सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे.
पाहणीत असे पहिल्यांदाच दिसून आले आहे की, सेनेतील भ्रष्टाचार हा सगळ्यात कमी म्हणजे शिक्षण विभागापेक्षाही कमी आहे.
वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायपालिका आणि न्यायालय या वर्षी भ्रष्टाचाराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. जो गेल्या वर्षी सहाव्या क्रमांकावर होता. मागील काही वर्षात पोलिस व्यवस्था सर्वात वरच्या क्रमांकावर होती. मात्र यंदा महसूल विभागाने त्याला मागे टाकले आहे.