आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोराच्या उलट्या बोंबा: अबू हमजा आणि पाकिस्‍तानचा काही संबंध नाही- मलिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ इस्‍लामाबादः मुंबई हल्‍ल्‍यातील प्रमुख सुत्रधार अबु जुंदल उर्फ अबू हमजा याला अटक केल्‍यानंतर अनेक खुलासे होत आहेत. परंतु, पाकिस्‍तानने नेहमीप्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा सुरु केल्या आहे.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील आरोपी अबू हमजा याच्या अटकेवरून पाकिस्तानने कोलंटउडी घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलाला अबू हमजा याचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. तो भारतीय आहे. हमजा भारतातच लहानाचा मोठा झाला. तेथेच तो शिकला आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देखील त्याने भारताचच घेतले आहे, असे पाकचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी सांग‍ितले.
अबू हमजा पाकिस्तानात आला असला तरी तो गैरमार्गानेच आला असेल. पाकिस्तानात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. विशेष म्हणजे मुंबई हल्ल्यात आयएसआयचा हात नसल्याचे मलिक म्हणाले. विशेष म्हणजे अबू जिंदाल आणि अबू हमजा हा एकच व्यक्ती नसून दोन स्वतंत्र व्यक्ती असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.
सरबजीतबाबत पाक सरकारची चूक नाही:
पाकिस्तानातील तरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सरबजीतच्या बाबतीत पाक सरकारकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले. मलिक म्हणाले, लष्कराच्या दबावाखाली येऊन पाक सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मुंबई हल्ल्यात पाकचाच हात: चिदंबरम
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे भारताचे गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सां‍‍गितले. पाकच दहशतवादी कारवाया करत असल्याचे जबीउद्दीनने दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले आहे.
झरदारी आणि सरकारमध्ये झाली होती डील:
दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता पी.एल. पुनिया एक खळबळजनक दावा केला आहे. तो म्हणजे, पाकचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी गेल्या एप्रिलमध्ये भारत दौर्‍यावर आले होते. तेव्हा पाक आणि भारतमध्ये एक 'डील' करण्यात होती. भारताने डॉ. खलील चिश्तीची सुटका करण्‍याची आणि पाकिस्तानने सरबजीतला सोडण्यास सहमती दिली होती. पुनिया यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी चर्चा करताना सांगितले.
दरम्यान, अबू हमजा याने मुंबई हल्‍ल्‍याच्‍यावेळी पाकिस्‍तानातून हल्‍लेखोरांना सूचना दिल्‍या. त्‍यांना हिंदी भाषा आणि खास मुंबईची शैली शिकविली. त्‍याने तशी कबुलीही दिली आहे. त्‍यामुळे तो पाकिस्‍तानातच होता, हे सिद्ध झाले. परंतु, पाकिस्‍तानने नेहमीप्रमाणे जुंदलपासून हात झटकले आहेत. भारताने पकडलेला व्‍यक्त अबू हमजा नव्‍हे. तसेच भारतात झालेल्‍या कोणत्‍याही हल्‍ल्‍यात आयएसआयचा हात नव्‍हता, असे सांगून गृहमंत्री रेहमान मलिक यांनी हात वर केले आहेत. जुंदल पाकिस्‍तानात आला असेल तर तो बेकायदेशीरपणे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
मुंबई हल्‍ल्‍याच्‍यावेळी अजमल आमिर कसाब याला जिवंत पकडण्‍यात यश आले होते. शहिद तुकाराम ओंबळे यांनी बलिदान देऊन त्‍याला जिवंत पकडले. कसाबबद्दलही पाकिस्‍तानने असाच पावित्रा घेतला होता. कसाब पाकिस्‍तानचा नव्‍हेच, असा आव पाकिस्‍तानने आणला होता. परंतु, काही दिवसांनीच सत्‍य बाहेर आले. त्‍यामुळे पाकिस्‍तानच्‍या सर्व नेत्‍यांना तोंडघषी पडावे लागले होते. आताही पाकिस्‍तान तसाच पावित्रा घेत आहे
जुंदलचा ताबा मुंबई पोलिसांना देण्‍यास कोर्टाचा नकार
सरबजित नव्हे, सुरजित सुटणार
सर‍बजितचा निर्णय बदलण्‍यामागे झरदारींवर लष्‍कराचा दबाव?