आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंसाचार: इराकमध्ये बॉम्बस्फोट मालिका,44 नागरिकांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद: इराकची अनेक शहरे मंगळवारी बॉम्बस्फोट मालिकेने हादरली. एकापाठोपाठ एक असे हे हल्ले करण्यात आले. यात 44 ठार, तर 200 जण जखमी झाले. इराकवरील अमेरिकेच्या आक्रमणाच्या स्मृतीदिनीच स्फोटांंची मालिका घडविण्यात आली आहे.
उत्तरेकडील किरकुक व दक्षिणेतील कारबाला शहरात सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान हे हल्ले करण्यात आले. बगदाद शहरात कार बॉम्बचा स्फोट करण्यात आला. शहरात 27 ते 29 मार्चदरम्यान होणाºया अरब लीगच्या बैठकीनिमित्त अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येऊनही हा स्फोट घडवण्यात हल्लेखोरांना यश आले, असे परराष्ट्र विभाग, वैद्यकीय विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
कारबाला शहरात रस्त्याच्या बाजूला दोन स्फोट झाले. हे स्फोट शहराच्या प्रवेशद्वारावर झाले. त्यात 13 नागरिक ठार, तर 48 जखमी झाल्याचे प्रांताचे आरोग्य विभागाचे प्रवक्ते जमाल मेहदी यांनी सांगितले. आमच्या रुग्णालयात अनेक मृतदेह दाखल होत आहेत, परंतु ते नेमके कोणाचे आहेत, हे समजू शकलेले नाही, असे डॉ. मोहम्मद अब्दुल्लाह यांनी सांगितले. हिल्ला शहरातही कारबॉम्बने स्फोट घडवण्यात आला. हे नगर बगदादच्या दक्षिण भागात आहे. या ठिकाणी दोन ठार तर 31 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बगदादच्या मध्यस्थानी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर 11 जखमी झाले. पश्चिम अनबर प्रांताची राजधानी रमदीमध्येही कारच्या साह्याने स्फोट घडवण्यात आला. सलाहाद्दीन प्रांतात बॉम्बस्फोट व गोळीबारात दोन ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. मोसुल, बैजी येथेही स्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे. दकक व अल धुलउयाह शहरातील स्फोटात 20 नागरिक जखमी झाले आहेत.
23 फेब्रुवारीच्या घटनेनंतरचा इराकमधील हा भीषण हल्ला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत 150 नागरिक ठार झाले होते. त्यावेळी अल-कायदा संघटनेने केलेल्या हल्ल्यात 42 नागरिक ठार झाले होते. अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या दिवशीच आजची घटना घडली आहे. 2006 व 2007 मध्ये इराकमधील स्फोटाच्या घटनांत तुलनेने घट झाली होती.