आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Williams, Two Other Astronauts Dock With Space Station

सुनीता विल्यम्स पोहचली अंतराळ स्थानकावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्को/ह्युस्टन- भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दोन साथीदारांसह मंगळवारी अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहचली. यानाच्या उड्डाणानंतर स्थानकावर पोहचण्यास तिला दोन दिवस लागले.
रविवारी सुनीताने जपानचा आकिहिको होशिदे आणि रशियाचा युरी मालेचेंको यांच्यासमवेत सोयूझ यानाने अंतराळात झेपावली होती. अंतराळ स्थानकात रशियाचे जेनेडी पेडेल्का, सर्गेई रेबिन आणि अमेरिकेचा जोसेफ अकाबा गेल्या मेपासून मुक्कामी आहेत. हे सर्व अंतराळवीर दोन महिने विवधि प्रयोगांतून संशोधन करतील. जेनेडीसह तीन अंतराळवीर 17 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीवर परतण्याची शक्यता असून त्यानंतर सुनीता विल्यम्सकडे या मोहिमेची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे. सुनीता सुमारे चार महिने अंतराळ स्थानकात राहणार आहे. संशोधनासाठी तिने बेडूक आणि मासे सोबत नेले असून अंतराळात या प्राण्यांच्या शरीररचनेतील बदलांचा अभ्यास ती करेल.