आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन वर्षांच्या किराण्यासह मंगळावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्यूस्टन- भूलभुलैया वाटावी अशी 50 च्या दशकातील जुन्या धाटणीची इमारत. पांढरे कोट घातलेल्या शास्त्रज्ञांची पदार्थ बनवण्यासाठी सुरू असलेली लगबग. पदार्थ एकत्र करून, ढवळून, नवीन पदार्थ तयार करणे आणि विशेष म्हणजे त्या चवही घेणे. अर्थात तयार पदार्थांशिवाय अंतराळवीरही यानामध्ये पदार्थ तयार करू शकतील. तीन वर्षे पुरेल एवढी अन्नधान्याची बेगमी यासाठी करण्यात येणार आहे.
सन 2030 मधील मानवाच्या मंगळावरील स्वारीसाठी मेनू तयार करण्याचे काम या नासाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. सहा ते आठ अंतराळवीरांसाठी हा मेनू तयार करण्याचे काम सुरू आहे. मोहिमेवर जाणार्‍या प्रत्येकाला आवडेल, त्यांची तब्येत ठणठणीत ठेवेल विशेष म्हणजे तो रुचकर असेल असा मेनू तयार करण्याचे आव्हान या शास्त्रज्ञांसमोर आहे. एखाद्या कुटुंबासाठी तीन वर्षांचा किराणा सामान एकदाच भरण्यासारखे आहे आणि पुढील तीन वर्षांत कोणकोणते पदार्थ तयार करायचे याची तपशीलवार योजना तयार करण्यासारखेच ते आहे. मंगळ ग्रह खूपच दूर असल्यामुळे इतर ग्रहांपेक्षा तो खूपच वेगळा आहे असे वरिष्ठ शास्त्रज्ञ माया कूपर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाप्रमाणे दर सहा महिन्यांनी एखादे यान पाठवून अन्नधान्य पाठवणे शक्य नाही. असे लॉकहीड मार्टिन कंपनीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही कंपनी मेनू बनवण्याच्या कामात मदत करीत आहे.
मोहिमेवर जाणार्‍या अंतराळवीरांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. या अंतराळवीरांसाठी तब्बल 100 च्यावर चविष्ट पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. मंगळावर गुरुत्वाकर्षण खूपच कमी आहे. त्यामुळे पदार्थांना वास सुटण्याचा आणि ते नरम पडण्याचा धोका आहे. त्याचबरोबर त्याच्या चवीतही बदल होणार आहे. कारण हे पदार्थ दोन वर्षे आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवून वाळवण्यात येणार आहेत. मंगळावर अंतराळवीरांना स्वत:लाही खाद्यपदार्थ बनवता येतील. भाज्या चिरणे, कुकरमध्ये पाणीही गरम करता येणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते.
यानामध्ये मार्टियन ग्रीन हाऊस तयार करण्यात येणार आहे. येथे मातीऐवजी खनिज व क्षारयुक्त पाण्यामध्ये गाजर, ढोबळी मिरची, फळे पिकवता येतील अशी व्यवस्था या ग्रीन हाऊसमध्ये करण्यात येईल. या बागेतील फळे, भाज्याच अंतराळवीर खाऊ शकतील.
सुनीता विल्यम्स पोहचली अंतराळ स्थानकावर!