आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युसूफ गिलानी इमानदार नाहीत; पाकच्या सुप्रीम कोर्टाचे मत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद: पंतप्रधान युसूफ रजा गिलानी हे इमानदार व्यक्ती नसल्याचे खळबळजनक मत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची मदत करून त्यांनी घटनेचे उल्लंघन केले असल्याचाही ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने झरदारी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात स्वीस बँकेस गिलानींना पत्र लिहिण्याचे निर्देश दिले होते. झरदारीविरुद्ध बंद करण्यात आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे पुन्हा चालवण्यात यावीत, असे विनंती पत्राद्वारे करण्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र गिलानी यांनी या निर्देशांचे पालन केले नाही. पाच सदस्यीय पीठाने सांगितले, पंतप्रधानांनी देशाची घटना धुडकावून आपल्या राजकीय पक्षाप्रतीच इमानदारी दाखवली आहे. त्यांनी आपली शपथ आणि कुरानचेही उल्लंघन केले आहे. ते इमानदार व्यक्ती नसल्याचे पहिल्याच नजरेत समजते, असे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.न्यायपीठाने गिलानी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहा पर्याय समोर ठेवले आहेत. यात त्यांच्या संसद सदस्यत्त्वावर बंदी लादण्याच्याही पर्यायाचा समावेश आहे. सोबतच चीफ जस्टिस इफ्तिखार गिलानी यांनी एक सर्वशक्तीमान न्यायपीठ तयार करण्याची सूचनाही केली आहे.