आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zardari Discuses Situation In Pakistan With Gilani

झरदारींनी गिलानींसोबत घेतला पाकिस्‍तानातील राजकीय स्थितीचा आढावा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- दुबईहून अचानक मायदेशी परतल्यानंतर प्रथमच पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी पंतप्रधान युसूफ रझा गिलानींसोबत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पुढील उपचारासाठी झरदारी लंडनला जाणार असल्याचे वृत्त सरकारने फेटाळले आहे.
गिलानी,अवामी नॅशनल पार्टीचे प्रमुख अस्फंदयार वलीखान यांनी मंगळवारी रात्री झरदारींचे खासगी निवासस्थान बिलावल हाऊस येथे भेट घेतली यावेळी सिंधचे मुख्यमंत्री कैम अली शाह यांचीही उपस्थिती होती. झरदारी मायदेशी परतल्यानंतर गिलानींसोबत त्यांची ही पहिलीच बैठक होती.राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राजकीय क्षेत्रात झालेल्या काही घडामोडींवर विशेष चर्चा करण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते फरहतुल्लाह बाबर यांनी सांगितले. झरदारी यांनी जमियत ए इस्लामचे प्रमुख मौलाना फ झलुर रेहमान यांच्याशीही फ ोेनवरून चर्चा करीत परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान,झरदारी लंडनला जाणार असल्याच्या बातम्या पाकिस्तानी मीडियात आल्या आहेत.या बातम्या म्हणजे निव्वळ वावड्या असल्याचे राष्ट्राध्य्Þाक्षांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. झरदारी देशातच आहेत .त्यांचा परदेशी जाण्याचा अजिबात विचार नाही असे प्रवक्ते बाबर यांनी सांगितले. झरदारी आणखी काही दिवस कराचीतच मुक्काम करणार आहेत.येत्या 27 डिसेंबर रोजी झरदारींच्या दिवंगत बेगम बेनझीर भुत्तो यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. भुत्तो यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रामांना उपस्थित राहता यावे यासाठीच झरदारी पाकिस्तानात परतल्याचे सांगितले जाते. मेमोगेट प्रकरणात झरदारींविरोधात काहूर उठल्यानंतर लष्कराने त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता. सर्वोच्च न्यायालयातही मेमोगेट प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.